आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Zilha Parishad News In Marathi, Divya Marathi, Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद झेडपीवर आघाडीचे वर्चस्व; काँग्रेसचे महाजन अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचे पवार उपाध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/बीड/ जालना - औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे श्रीराम महाजन यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिनकर पवार यांची निवड झाली. महाजन यांनी शिवसेनेचे अनिल चोरडिया यांना ९ मतांनी पराभूत केले. उपाध्यक्षपद निवडणुकीत पवार यांनी भाजपच्या इंदू वाघ यांना नऊ मतांनी पराभूत केले.

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाच्या रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी व महायुतीचे संख्याबळ २९-२९ असे समान झाल्याने लॉटरीद्वारे घेतलेला कौल आघाडीच्या बाजूने लागला. राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या आशाताई दौंड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे गयाबाई कराड तर उपाध्यक्षपदासाठी दशरथ वनवे
रिंगणात होते.

जालन्यात युतीची सरशी
जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांची निवड झाली. अध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या जाधव यांनी राष्ट्रवादीचे पंकज बोराडे यांना तर तर उपाध्यक्षपद निवडणुकीत अ‍ॅड. संजय काळबांडे यांना पराभूत केले. कॉंग्रेसचे चार सदस्य तर राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य गैरहजर होता.