आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जि. प. उपाध्यक्षांच्या हाती आणखी आठवडाभर सत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नाहिदबानो पठाण यांनी विभागीय जात प्रमाणपत्र वैधता समितीच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका खंडपीठात दाखल केली. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सुरू आहेत. खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी 19 सप्टेंबरला प्रकरणाची सुनावणी ठेवली असून तोपर्यंत जिल्हा परिषद उपाध्यक्षा विजया चिकटगावकर यांच्याच हाती जिल्हा परिषदेची सत्ता राहणार आहे.

जि.प.च्या तत्कालीन अध्यक्षा नाहिदबानो पठाण यांच्या मोमीन जातीच्या वैधता प्रमाणपत्राचा दावा खंडपीठाने फेरपडताळणीसाठी जात वैधता समितीकडे पाठवला होता. समितीच्या तीन सदस्यांनी एकमताने त्यांचा दावा अवैध ठरवला. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जि.प. अध्यक्षपद रिक्त दाखवले. या पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली आणि अध्यक्षपदी काँग्रेसच्या शारदा जारवाल निवडून आल्या. खंडपीठाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी दिली होती, परंतु निवडून आलेल्या व्यक्तीस कामकाज करण्यास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. नाहिदबानो प्रकरणाची खंडपीठात 11 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू आहे. गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे खंडपीठाने पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला ठेवली आहे. सोमवार 16 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वैजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.