आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतीवर आक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांच्या आरक्षणामुळे ७० टक्क्यांवर सदस्यांचे गट हिरावले गेले. काही ठिकाणी नको त्या गट गणांत गावांचा समावेश झाल्याने ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यातून दिग्गज सदस्यांसह ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला असून राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. न्याय मिळाला नाही तर निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गट गणांच्या आरक्षण सोडतीमुळे बहुतांश आजी माजी सदस्य नाराज आहेत. काही गावे, तालुके असे आहेत जेथे अनुसूचित जाती-जमातींची संख्या जास्त असूनही तेथील गण-गट सर्वसाधारण ओबीसी, महिलांसाठी राखीव झाले आहेत. काही ठिकाणी खुल्या प्रवर्गातील लोकसंख्या जास्त असताना अनुसूचित जाती-जमातीसाठी गट गण आरक्षित झाले आहेत. यामुळे मतदार नाराजी व्यक्त करत आहेत. आरक्षण सोडतीमुळे काही गावे नको असलेल्या गणांत गटात समाविष्ट झाल्यामुळे येथील ग्रामस्थ अस्वस्थ आहेत.
प्रकरण दोन : वैजापूर तालुक्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

येथून अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार निवडून जाणे आवश्यक आहे. मात्र, आरक्षण सोडतीने हा हक्क हिरावून घेतला आहे. विशेष म्हणजे, जागांपैकी एकाही ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटले नाही. कटकारस्थान करून चुकीच्या पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. बहुसंख्येने असलेल्या अनुसूचित जातीवर झालेला हा अन्याय आहे. तो दूर व्हावा, अनुसूचित जातीला गट मिळावेत, यासाठी देविदास कचरू त्रिंबके यांनी जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून न्याय मागितला आहे. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारी, हरकतींसाठी २० ऑक्टोबरची मुदत
आरक्षणसोडतीवर२० ऑक्टोबरपर्यंत तक्रारी हरकती दाखल करता येणार आहेत. आमच्याकडे अद्याप कुणाचीही तक्रार आलेली नाही.
-देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी.

प्रकरण एक : ओव्हर ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव, न्याय द्या नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू.
सोडतीवरदहा दिवस मतदारांच्या हरकती, तक्रारी जाणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाणार आहे. हा एकमेव पर्याय आशा असल्याने नाराज ओव्हर ग्रामवासीयांना आरक्षण सोडतीचा निर्णय अमान्य असून अन्याय करणारा असल्याचे म्हटले आहे. सावंगी गण ओव्हरपासून जवळ आहे, तर पळशी लांब पडते. सेवा सुविधा, दळणवळणाच्या बाबतीत सावंगी सोयीस्कर आहे. आजूबाजूच्या सर्व गावांचा सावंगीत केवळ ओव्हर गावाचा पळशीत समावेश करणे योग्य नाही. याचा प्रशासन शासनाने गांभीर्याने विचार करावा. सावंगी गणातच ओव्हर गाव घ्यावे, अन्यथा आगामी जि. प. पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा ग्रामपंचायतीचा ठराव तालुका निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. त्यावर सरपंच सखुबाई सोनवणे, उपसरपंच गणेश नलावडे, माजी सरपंच नामदेव नलावडे दामोदर जाधव, अरुण काळे, लक्ष्मण फुके, ज्ञानेश्वर तारे, जमीरखाँ पठाण, दादाखाँ पठाण, गफार पठाण, मोईनखाँ पठाण, पुंडलिक नलावडे, बबन नलावडे, शिवनारायण वैद्य, रऊफ पटेल आदींच्या सह्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...