आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जि.प.तील भरती प्रक्रियेतील गोंधळाची चौकशी होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या आरोग्य सहायक पदासाठीच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उडाल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. गोंधळाची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वीही गोंधळामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
आरोग्य विभागाने आरोग्य सहायकांच्या 34 जागांसाठी अर्ज मागवले होते. परंतु मराठवाड्यात जो अभ्यासक्रमच शिकवला जात नाही, त्याची अट घातल्यामुळे भरतीस अपात्र ठरलेल्या तरुणींनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने ऐनवेळी ही प्रक्रिया रद्द केली. याअगोदर तीन महिन्यांपूर्वी भरतीत उमेदवारांना डावलण्यात आल्याने प्रक्रिया रद्द झाली होती. मंगळवारी तरुणींनी चपला, बूट दाखवून जि.प. प्रशासनाचा निषेध केला होता. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी घेतला. पुढील एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्णपणे राबवण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे.
शेतकर्‍यांनाही पुरस्कार
शिवार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शेतकर्‍यांसाठी लेखन करणार्‍या साहित्यिकास पुरस्कार दिला जातो, परंतु ज्यांच्यासाठी लेखन केले जाते त्यांना देखील पुरस्कार द्यायला हवा, अशी मागणी पुढे आली. पुढील वर्षीपासून शेतकर्‍यांही पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा अध्यक्षीय भाषण करताना रा. रं. बोराडे यांनी केली.