आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद झेडपीच्या 80 टक्के शाळा ‘थर्डक्लास’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सुरू केलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांच्या मूल्यांकनात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि लातूर जिल्हय़ातील 80 टक्के शाळा थर्डक्लास म्हणजे ‘क’ दर्जाच्या आढळल्या आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील शाळांच्या गुणवत्तेचा अहवाल अद्याप सरकारला प्राप्त झालेला नाही, मात्र या दोन जिल्ह्यांतील अहवाल पाहता राज्यातील अन्य शाळाही अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारावा यासाठी ग्रामविकास विभागाने समित्यांची नेमणूक करून शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यातून ही स्थिती स्पष्ट झाली.