आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabadite Rais Khan, Naim Khan Recorded Their Name In Guinies Book

औरंगाबादकर रईस खान, नईम खान यांची गिनीज बुकमध्‍ये नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पारंपरिक व्यवसाय आणि पोटासाठी शिक्षणाची चौकट मोडून औरंगाबादच्या रईस खान, नईम खान
यांनी गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले आहे. त्यांनी तायक्वांदोच्या फुल काँस्टेस किक या क्रीडा प्रकारात आयर्लंडच्या संघाचा दोन वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. हे दोघेही आझाद चौक, किराडपुरा येथील रहिवासी आहेत.

सात जुलैला हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी गिनीजच्या अधिकार्‍यांच्या साक्षीने 37 हजार 161 किक मारल्या. त्यावेळी आयर्लंडच्या संघाने 2011 मध्ये प्रस्थापित केलेला 32 हजार 428 किकचा विक्रम मोडीत निघाला. तायक्वांदोमधील त्यांचे गुरू जयंता रेड्डी यांनी या विक्रमासाठी तयार केलेल्या संघात रईस, नईम खान बंधूंचा समावेश होता. रईसने संघात सर्वाधिक म्हणजे 3810 तर नईमने 2142 किक लगावल्या. या दोघांच्या कुटुंबांचा वाळू विक्री व्यवसाय आहे. रईस यांनी शालेयस्तरावरील तायक्वांदोची आवड जोपासण्यावर भर दिला. त्यांनी 1992 मध्ये पहिला यलो बेल्ट मिळविल्यावर मागे वळून पाहिले नाही. नेपाळ, बांगलादेशातील स्पर्धांत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. 2001 मध्ये लंडनला झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.

गुरू जयंता रेड्डी यांनी हेरली आणि गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी तयार होत असलेल्या संघामध्ये सहभागी व्हा, असे सांगितले. मग दक्षिण कोरियातील कुक्कीवोन वल्र्ड तायक्वांदो हेडक्वार्टर्स येथील सर कांग वोन सिक यांनी हैदराबादेत येऊन त्यांना दोन आठवडे विशेष प्रशिक्षण दिले. पायाला वजन बांधून किक कशी मारायची याविषयी मार्गदर्शन केले. विश्वविक्रमाबद्दल रईस, नईम यांचा ‘दिव्य मराठी’तर्फे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. या वेळी निवासी संपादक धनंजय लांबे यांचीही उपस्थिती होती.