आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabadites Get Samantar Water After Two Years

औरंगाबादकरांना दोन वर्षांनंतर समांतर जलवाहिनीचे पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- 'समांतर'वर दहा महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी समांतर योजनेनुसार जायकवाडीपासून मुख्य पाइपलाइन टाकणे आवश्यक होते. मात्र, आता ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतरच शहरवासीयांना "समांतर'चे पाणी मिळणार असल्याचे समोर आले आहे.

शहराचा पाणीपुरवठा समांतरच्या ताब्यात आल्याबरोबर त्यांच्याकडून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतची मुख्य पाइपलाइइन टाकण्याचे काम करणे अपेक्षित होते. तेव्हा कामाला प्रारंभ झाला असता तर पुढील एक ते दीड वर्षात पाणी मिळाले असते. मात्र दहा महिन्यांनंतर त्यांनी पाइपलाइन टाकण्याकरिता टेंडर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे कमीत कमी दोन वर्षे आणि जास्तीत जास्त तीन वर्षे शहरातील नागरिकांना "समांतर'चे पाणी मिळण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी समांतर कंपनीने मुख्य पाइपलाइनचे काम केले तरी फारोळा, नक्षत्रवाडीसह एक्स्प्रेस लाइनचे काम करण्यासाठी जलद पावले उचलल्यावरच दोन-तीन वर्षांत पाणी मिळू शकते; अन्यथा आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याचेही समोर आले.

दोन वर्षांत ही कामे होणार : शहरात नवीन ३५ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ ठिकाणी माती परीक्षण करण्यात आले. साधारणत: पाण्याच्या टाक्या उभारणीसाठी किमान १४ महिन्यांचा अवधी लागतो. या सगळ्या पाण्याच्या टाक्या एकमेकांशी अंतर्गत जोडाव्या लागणार आहेत. त्यासाठी वेगळा अवधी द्यावा लागणार आहे. यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. मुख्य पाइपलाइन ५० किमीची आहे. चारपदरी रस्ता झाल्यानंतर अथवा काम सुरू करताना ती टाकावी लागणार आहे. तसेच शहराअंतर्गत साधारणत: १५० किमीची पाइपलाइन राहणार असून ऐनवेळी त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. ही सगळी पाइपलाइन हायड्रॉलिक प्रणालीने युक्त अशी असणार आहे.

काय आहे हायड्रॉलिक प्रणाली?
शहरात १२ मीटर उंचीवर असलेल्या घरांना एकाच वेळी आणि मुबलक पाणी पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणारे हे तंत्रज्ञान आहे. सगळे नळ व पाइपचे कनेक्शन हे एका संगणकास जीपीएस प्रणालीने जोडलेले असेल. त्यामुळे कुठेही लिकेज अथवा गळती सुरू झाल्यास काही वेळातच कळेल. परिणामी दुरुस्ती सहज होईल. मात्र ही यंत्रणा बसवण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

समांतर प्रसत्नशील
शहराला लवकर पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र घरात "समांतर'चे पाणी येण्यासाठी दोन वर्षे लागतील. अर्णब घोष, प्रकल्प संचालक, समांतर

२ वर्षे बरोबर लागतील
समांतर'ला काम सुरू करण्यास विलंब झाला असला तरी ते पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
सखाराम पानझडे, शहर अभियंता