आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे ११० लघुउद्योजक जागतिक यादीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील लघुउद्योजकांना जागतिक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने लीन क्लस्टर्सची योजना सुरू केली आहे. गेले दोन महिने केंद्रसरकारच्या उद्योग मंत्रालयातील अधिकाऱ्यांची टीम औरंगाबादेत या संदर्भात काम करीत होती. या योजनेत शहरातील ११० उद्योजकांनी सहभाग घेतला असून सरकारच्या हे सर्व उद्योजक जागतिक दर्जाचे होणार आहेत. या संदर्भात २७ २८ ऑगस्ट रोजी वाळूजच्या मसिआ कार्यालयात उद्योजकांचे अंतिम ऑडिट केंद्र सरकारची टीम करणार आहे.

दोन वर्षांपासून केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. लघुउद्योजकांचे ऑडिट जगातिक दर्जाच्या मोठ्या सल्लागार कंपनीकडून करण्यात येते. यात उद्योगाच्या जागेचा आकार, मनुष्यबळ, उत्पादन करण्याच्या पद्धती माणसांशी संवादाची पद्धत, कारखान्यातील वातावरण, क्वालिटी सिस्टिम यावर सल्लागार काही सुधारणा सुचवतात.२०१५ या वर्षात मसिआच्या ५० सदस्यांनी केंद्र सरकारच्या लीन क्लस्टर्स योजनेत भाग घेतला.याचा खर्च केंद्र सरकार ८० टक्के तर उद्योजक २० टक्के करणार आहेत.२०१६ या वर्षात मसिआच्या अाणखी ६० उद्योजकांनी या योजनेत सहभाग घेत ही संख्या ११० वर नेली. गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रसरकारची टीम शहरातील या उद्याेगांना मार्गदर्शन करीत असून २७ २८ रोजी या सर्व उद्योगांचे अंतिम ऑडिट होणार आहे.

मसिआची टीम शिकागोला जाणार..
बुधवारी१४ ऑगस्ट रोजी मसिआचे सहा उद्योजक अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक दर्जाच्या उद्योग प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत. यात तुकाराम कंदापुरे, नामदेव खराडे, अंकुश लामतुरे, दिगंबर मुळे यांचा समावेश आहे.
औरंगाबाद जगाच्या स्पर्धेत
लीनक्लस्टर्सही योजना लघुउद्योजकांच्या फायद्याची आहे कारण जागतिक दर्जाचे ऑडिट करणाऱ्या कंपन्या मार्गदर्शन करून उद्योगांना लीन चा दर्जा देणार आहे. यात प्रथमच ११० उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. विजय लेकुरवाळे,अध्यक्ष मसिआ
२८ रोजी सोलार रूफटॉप वर जर्मन तज्ज्ञांची कार्यशाळा : मसिआच्या वतीने २८ ऑगस्ट रोजी हॉटेल लेमन ट्री येथे सोलार रूफटॉप या विषयावर जर्मनी येथील तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...