आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे सर्व ८८ अमरनाथ यात्रेकरू सुखरूप, आज दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर पेटलेल्या काश्मीर खोऱ्यात अमरनाथच्या दर्शनासाठी गेलेले औरंगाबादचे ८८ यात्रेकरू सुखरूप अाहेत. संपूर्ण मार्गात त्यांना कोठेही अडथळा आलेला नाही, अन्नाची टंचाईही जाणवली नाही. पावला-पावलावर सुरक्षा जवान तैनात असल्याने भयमुक्त वातावरणात भाविकांचा जथ्था मार्गोत्क्रमण करत आहे. वेड्यावाकड्या, निमुळत्या वाटा, मध्येच कोसळणारा पाऊस आणि त्यामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यातून मार्ग काढत औरंगाबादचे हे भाविक गुरुवारी बाबा अमरनाथच्या चरणी लीन होतील.
हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी याच्या खात्म्यानंतर काश्मीर खाेऱ्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे. दंगेखोरांकडून पोलिसांसह सर्वसामान्यांवर हल्ले हाेत आहेत. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका अमरनाथ यात्रेकरूंना बसला आहे. हजारो यात्रेकरू जम्मू आणि श्रीनगरमध्ये अडकून पडले होते. सोमवारी वातावरण निवळल्यानंतर कडेकोट बंदोबस्तात यात्रेकरूंना श्रीनगरहून जम्मूला नेले जात आहेत, तर पहेलगामच्या बेस कॅम्पपासून अमरनाथला जाण्यासाठी परवानगी दिली जात आहे.
औरंगाबादहून ८८ यात्रेकरूंचा जथ्था जुलै रोजी सचखंड एक्स्प्रेसने अमरनाथला रवाना झाला. यात ३० महिलांचा समावेश आहे. औरंगाबादकरांच्या यात्रेचे हे २० वे वर्ष आहे. ११ तारखेला हा जथ्था जम्मूला पोहोचला. तेव्हापासूनच येथे तणावपूर्ण वातावरण आहे. अशाही परिस्थितीत १२ तारखेला पहाटे अडीच वाजता सीमा सुरक्षा दलाच्या कडक बंदाेबस्तात १० हजार भाविकांना पुढील प्रवासासाठी नेण्यात आले. जम्मू-नरोटामार्गे १२ तारखेला रात्री साडेदहा वाजता हा जथ्था बनिहालला पोहोचला.
या ठिकाणी रात्री विश्रांती घेतल्यावर बुधवारी सकाळी यात्रेकरूंनी पुढील प्रवास सुरू केला. बुधवारी दुपारी १२ वाजता ते बालतालला पोहोचले. बुधवारी येथेच मुक्काम करून गुरुवारी पहाटे वाजता पुढील प्रवासाला निघतील. येथून १४ किलोमीटरचे अंतर कापून ते अमरनाथला पोहोचतील. यात गुरुवारचा संपूर्ण दिवस जाईल. संध्याकाळी तेथून परतीचा प्रवास करत ते रात्री १२ वाजेपर्यंत बालतालच्या बेसकॅम्पवर पोहोचतील. दिवसा अनुचित प्रकार घडत असल्याने भाविक पहाटे किंवा रात्री प्रवास करत आहेत.
अडचण नाही आली
आमचा आतापर्यंतचा प्रवास सुखरूप झाला. पावला-पावलावर सुरक्षा जवान तैनात आहेत. यामुळे कोणाच्याही मनात भीती नाही. संपूर्ण मार्गावरील सर्व लंगर, हॉटेलांमध्ये भरपूर अन्नधान्य आहे. काेणालाही उपाशी, तहानलेले राहण्याची वेळ आलेली नाही. एकेका हॉटेलमध्ये १५० ते २०० क्विंटल तांदूळ, साखर, डाळींचा साठा आहे. किमान महिनाभर पुरेल एवढे धान्य आहे. - ताराचंद कहाते, यात्रेकरू, बालताल बेस कॅम्प
बातम्या आणखी आहेत...