आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादकरांनी वाचवले आणखी चार जणांचे जीव, शिक्षक सुनील बुधवंत यांचे अवयव दान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुलडाणा जिल्ह्यातील राम मगरच्या अवयव दानानंतर अवघ्या १६ दिवसांतच याच जिल्ह्यातील ३९ वर्षीय शिक्षक सुनील माधवराव बुधवंत यांचे अवयव दान झाले. रामच्या वेळी हृदय प्रत्यारोपण होऊ शकले नव्हते. ही चूक या वेळी सुधारण्यात आली. बुधवंत यांचे हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले. मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. यकृत पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात पाठवण्यात आले. एक किडनी धूत तर दुसरी बजाज रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आली.

सुनील यांना मेंदूविकार असल्याचे निदान चार वर्षांपूर्वीच झाले होते. उपचारही सुरू होते. मात्र, २२ जानेवारीला मेंदूतील रक्तस्राव थांबल्याने एमआयटी रुग्णालयात दाखल केले गेले. २८ रोजी सायं. ७.३० वाजता मेंदूला रक्त पुरवठा करणारी वाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव झाला. २९ रोजी सकाळी वा. एमआयटीचे मेंदूशल्यचिकित्सक डॉ. अंशुल बगडिया यांनी रुग्ण ब्रेनडेथ असल्याचे सांगितले अन् येथून पुढचा प्रवास सुरू झाला.

जनजागृतीचा फायदा
अवघ्या१६ दिवसांपूर्वी रामच्या अवयव दानाची माहिती सुनील यांच्या नातेवाइकांना होती. अवयव दान करून आपणही चार संसार वाचवू शकतो या जाणिवेने त्यांनी त्यांची आई आणि पत्नीची मानसिक तयारी केली.

पुढे वाचा... 'धूत'च्या टीमने केली तपासणी