आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 332 कोटींचे मुद्रा लोन वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात मुद्रा लोनचे सर्वाधिक वाटप करण्यात आले आहे. तब्बल ३३२ कोटी रुपायांचे लोन जिल्ह्यातील ८६,९५१ लोकांना वाटप करण्यात आले असून विनातारण लोन मिळत असल्यामुळे सर्वसामान्यांना नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच व्यवसायवृद्धीसाठी चांगला फायदा होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात तिप्पट लोनचे वाटप करण्यात आले आहे. 
 
सर्वसामान्यांना बँकांतून कर्ज मिळवणे नेहमीच अवघड जाते. त्यात उद्योगासाठी कर्ज म्हटले की, बँकेच्या तारणापासून ते अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र, मुद्रा लोनच्या माध्यमातून विनातारण कर्ज मिळत असल्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. केंद्र सरकारने एप्रिल २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. 
 
जिल्ह्यातझाले तिप्पट कर्ज वाटप : मागील वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात १११ कोटींचे कर्ज वाटप झाले होते. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जी. जी. वाकडे यांनी सांगितले की, या वर्षी डिसेंबर २०१६ अखेर ८६,९५१ लोकांना ३३२ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तिप्पट मुद्रा लोनचे वाटप करण्यात आले आहे. 
 
कर्जाची मागणी जास्त असल्यामुळे मार्चअखेर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विनातारण कर्ज दिले जाते. त्यासाठी कोटेशन, परवाना, आधार कार्ड, फोटो तसेच व्यवसायासंबंधीची माहिती द्यावी लागते.
 
मुद्रा लोनच्या माध्यमातून शिशू, किशोर आणि तरुण या तीन विभागाअंतर्गत कर्जपुरवठा केला जातो. शिशुअंतर्गत ५० हजार, किशोरमध्ये ५० हजार ते पाच लाख, तर तरुणअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे लोन दिले जाते. जिल्ह्यात शिशुअंतर्गत ८४१३० लोकांना १६६ कोटी, तर किशोरअंतर्गत ४४५५ लोकांना ८७ कोटी आणि तरुणअंतर्गत १०६६ लोकांना ७८ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...