आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोल बंद; वेळ, पैशांची बचत खड्डय़ांचा मनस्ताप कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील चार टोलनाके बंद झाल्याने वाहनधारकांची पैशांसह वेळेचीही बचत होत असल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे सूर उमटत आहेत. टोलनाक्यावर 10 ते 30 मिनिटांचा कालावधी लागत असल्याने वेळ, इंधन व पैशांचा अपव्यय टळला असून आता महामंडळाच्या बसगाड्या वेळेत धावत असल्या तरी खड्ड्यांचा मनस्ताप मात्र कायम आहे.
शासनाच्या टोल धोरणाचे नियम धाब्यावर बसून खराब रस्त्यांवर व कमी अंतरात काही एजन्सीधारकांनी टोल वसुली सुरू केली होती. गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी जनसामान्यांचा रोष लक्षात घेऊन लासूरच्या टोल नाक्यावर आंदोलने करून शासनाला टोल बंद करण्यास भाग पाडले. जिल्ह्यात लासूर स्टेशन, सावंगी, चितेगाव व करमाड येथे चार टोलनाके होते. जालना रोडवरील करमाड टोलनाका सोडला, तर सर्व टोल असलेल्या मार्गांची चाळणी झाली आहे.
टोल बंद झाल्याने सर्वाधिक फायदा एसटी महामंडळाचा झाला. टोलनाक्यावर दररोज धावणा-या हजारो एसटी गाड्यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या टोलसह इंधन व वेळेची बचत होऊन गाड्या नियोजित स्थानकात वेळेआधी पंधरा-वीस मिनिटे पोहोचत असल्याचे एसटी विभाग नियंत्रकांनी सांगितले. टोलनाके बंद झाल्याने या चार टोल नाक्यावरून दररोज 10 हजार वाहने ये-जा करता होती. किमान 10 मिनिटे जर नाक्यावर चालू स्थितीत वाहन असले या वाहनाचे सुमारे 7 हजार लिटर इंधनाचा अपव्यय होत होता.
लासूर स्टेशन टोलनाका
दररोजचे उत्पन्न : एक ते सव्वा लाख
गाड्यांची संख्या
600 ट्रक 100 ट्रॅव्हल्स
600 इतर
सावंगी टोलनाका
दररोजचे उत्पन्न : 10 ते 12 लाख रुपये
गाड्यांची संख्या
550 जीप
350 एसटी
1200 इतर
चितेगाव टोलनाका
दररोजचे उत्पन्न : 4 ते 5 लाख रुपये
गाड्यांची संख्या
950 जीप
300 एसटी
1300 इतर
करमाड टोलनाका
दररोजचे उत्पन्न - 10 ते 12 लाख
गाड्यांची संख्या
सुमारे तीन ते चार हजार वाहने अंदाजे
टोलनाके हटवल्याने दररोज चार लाख रुपयांची इंधन बचत
शासनाचे टोलधोरण व प्रत्यक्षात सुरू असलेल्या टोलनाक्यांच्या धोरणात मोठी तफावत आहे. यामुळे सामान्य नागरिकांची पिळवणूक होत होती. टोलनाक्यांविरोधात आंदोलन करून आम्ही टोल बंद पाडल्याने सामान्यांच्या वेळेसह, इंधन व पैशांची बचत होत आहे.
प्रशांत बंब, आमदार
टोलनाक्यावर रांगा असल्यावर अर्धा-अर्धा तास ताटकळत थांबावे लागत होते. यात इंधनाची नासडी होत होती. आता टोल बंद झाल्याने वेळेची व इंधनाची बचत होत आहे.
पन्नालाल बोर्डे, टॅक्सी ड्रायव्हर.
औरंगाबादहून जामनेरला जाणारी बस पूर्वी सिल्लोडला सकाळी नऊ वाजता येत होती. आता ही गाडी सकाळी साडेआठ ते 8.40 दरम्यान येत आहे. दोन वेळा मी स्थानकात 9 वाजता आलो, तेव्हा गाडी साडेआठलाच निघून गेल्याचे कळाले. टोलनाके बंद झाल्याने गाड्या आता 15 ते 20 मिनिटे अगोदर धावत आहेत.
सुदाम पाटील, प्रवासी, सिल्लोड
जिल्ह्यातील टोल बंद झाल्याने एसटी महामंडळाची वेळेसह इंधन व कोट्यवधींची आर्थिक बचत होत आहे. वेळेची बचत झाल्याने एसटीच्या फे -या वेळेत करण्यासाठी मदत होत आहे.
संजय सुपेकर, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ
> चार टोलनाक्यांवर सुमारे 10 हजार लहान-मोठी वाहने ये-जा करतात.
> टोलनाका बंद झाल्याने दररोज सुमारे 7000 लिटर डिझेलची बचत होते.
> 7000 लिटर डिझेल - 59 रु. दर; 4 लाख 13 हजार रुपयांची बचत दररोज.