आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील रस्त्यांसाठी 500 कोटी मागणार ; मनपाचे शिष्टमंडळ नायडूंना भेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रात युतीचे नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्याने औरंगाबादकरांसाठी अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत खड्डेच दिसणा-या रस्त्याच्या विकासासाठी 500 कोटींचा प्रस्ताव केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. निधीची मागणी करण्यासाठी महानगरपालिकेचे शिष्टमंडळ दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.

‘समांतर’ तसेच भूमिगत गटार योजना येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. यासाठी रस्ते खोदावे लागणार असून त्यानंतर रस्ते पूर्वस्थितीत असावेत यासाठी निधी लागणार आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही मी निधी मिळवला, आता तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे निधी मिळणारच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खैरेंनी केली रस्त्यांची पाहणी
शहरात व्हाईट टॉपिंग रस्ता कामाची खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पाहणी केली. या रस्त्यांवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्या. कामाचा दर्जा दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून तपासा. अशा सूचना त्यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे, जीटीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत मुजुमदार यांना केल्या. सा. बां. विभागातर्फे होत असलेल्या कामांसाठी पाच टक्केच निधी उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले.