आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा भार एकाच सुरक्षा रक्षकावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दक्षिण मध्ये रेल्वेने दहा वर्षांपूर्वी नांदेडला विभागीय कार्यालय निर्माण केले. दहा वर्षांत विभागाचा विस्तार होऊन प्रवासी संख्याही वाढली असली तरी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची मुख्य इमारत, मालधक्का, सीसीटीव्ही रूम, गोदाम, आरक्षण कार्यालय, रेल्वेची इतर मालमत्ता आदी भार केवळ एका सुरक्षा रक्षकावर आहे. 24 रेल्वेस्थानकांच्या सुरक्षेचे काम 30 जवान करत आहेत.

अखत्यारीत रेल्वेस्टेशन

मनमाड, अंकाई, नगरसोल, तारूर, रोटेगाव, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, दौलताबाद, औरंगाबाद, मुकुंदवाडी, चिकलठाणा, करमाड, बदनापूर, जालना, सारवारी, कोडी, रांजणी, परडगाव, परतूर, उस्मानपूर, सातोना, सेलू .

रेल्वेंची संख्या

औरंगाबाद स्थानकावरून प्रतिदिन 35 रेल्वे धावतात. मालगाड्यांची संख्याही दोन ते तीन दिवसाला असते. रात्रीच्या गाड्यांमध्ये सशस्त्र गार्ड तैनात करावे लागतात. औरंगाबादहून जाणार्‍या अजिंठा एक्स्प्रेस व काकिनाडा एक्स्प्रेससाठी सुरक्षा रक्षक द्यावे लागतात. इतर गाड्यांसाठी सुरक्षा रक्षक इतर ठाण्यांवरून पुरवले जातात.

ठाण्याची स्थिती

औरंगाबाद विभागात रेल्वे सुरक्षा दलाचे (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) एकूण कर्मचारी 30 आहेत.

या 30 कर्मचार्‍यांवर मनमाड ते सेलूदरम्यान येणार्‍या 24 रेल्वे स्थानकांची जबाबदारी आहे.

एक इन्स्पेक्टर, 2 सबइन्स्पेक्टर, 2 सहायक सबइन्स्पेक्टर, 10 हेडकॉन्स्टेबल, 15 कॉन्स्टेबल असे 30 कर्मचारी आहेत.

सुरक्षा रक्षकांकडे स्टेन गन, पिस्टल आदी शस्त्रास्त्रे आहेत, परंतु रेल्वेचा वाढलेला डोलारा पाहता किमान 75 रक्षकांची आवश्यकता आहे.