आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangbad Boys Planning To Complete 1110 KM In 24 Hours On Bike

औरंगाबादचे बाइकर्स करणार २४ तासांत १६१० किमी प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ३५० सीसीची बाइक, भन्नाट वेग, वाऱ्याशी स्पर्धा, हेल्मेट, लेदर जॅकेट आणि हायवेवरचा सलग २४ तासांचा प्रवास. काही बाइकवेड्या तरुणांसाठी स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी औरंगाबादच्या दोन व्यावसायिक तरुणांनी प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आहे.

व्यवसायाने वकील असलेले नरेश तांबडे व मार्केटिंग करणारे सुदर्शन पाटील या दोघांनी आपल्या रॉयल एनफील्ड थंडरबर्ट-३५० सोबत पुणे-बंगळुरू-पुणे हे १६१० किलोमीटर अंतर अवघ्या २४ तासांत पार करण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या पूर्ण प्रवासात फक्त एकच यू टर्न घेतला जाणार आहे. नरेश व सुदर्शन शनिवारी दुपारी तीन वाजता पुणे येथून हा प्रवास सुरू करणार आहेत.

ऑगस्ट २०१४ मध्ये शहरातील काही हौशी बाइकवेड्या तरुणांनी एकत्र येऊन थ्रॉटलर्स ग्रुपची स्थापना केली. ग्रुपमधल्या सर्व ३५ सदस्यांकडे ३५० पेक्षा जास्त सीसीच्या गाड्या असून अतिशय नियोजनबद्ध व वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून लाँग व शॉर्ट राइडचे आयोजन केले जाते. ग्रुपचा सदस्य होणाऱ्यांसाठीही ग्रुपचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. सदस्य व्हायचे असल्यास मुख्य सभासदासोबत एक राइड बंधनकारक असते, ज्याद्वारे सदस्याची ड्रायव्हिंग टेस्ट, वाहतुकीच्या नियमांची जाण कळते. १८ वर्षांवरील कोणीही या ग्रुपचा सदस्य होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व मानाच्या समजल्या जाणाऱ्या आयर्न बट असोसिएशनतर्फे बाइकवेड्यांसाठी रेकॉर्ड व त्यांचा बाइकवरचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी असे उपक्रम राबवण्यात येतात. या संस्थेच्या उपक्रमात सहभागी होणारे औरंगाबादचे हे पहिलेच तरुण असून त्यांच्यासोबत इतर चार तरुण पुण्याहून सहभागी होणार आहेत. भविष्यात थ्रॉटलर्सतर्फे लेह-लडाख, कच्छचे रण, टी-इस्टेट, काठमांडू, नेपाळ व नॉर्थ ईस्ट या ठिकाणी विविध प्रकारच्या राइड्सचे आयोजन करण्यात येणार आहे. या राइडची गेल्या ५ महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. तांबडे व पाटील यांना ग्रुपतर्फे राघवेंद्र बागडिया, अमर वर्मा, निरंजन जहागिरदार व संदीप मुळे यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठवाड्यातून पहिल्यांदाच सॅडल सोर उपक्रमासाठी दोन तरुण पात्र
पूर्ण प्रवासात फक्त एकच यू टर्न घेण्याची अट
- २४ तासांचा प्रवास १६ तासांत करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा असेल प्रयत्न
- भारत-सिंगापूर हायवे कमी वेळेत पार करण्याचा थ्रॉटलर्सचा मानस
- आयर्न बट असोसिएशनला पुराव्यासहित अहवाल द्यावा लागतो.
- प्रवासाच्या सुरुवातीच्या किमीचा फोटो
- पेट्रोल व खाण्याचे बिल
- कुठे व किती वेळ थांबले याच्या फोटोसह नोंदणी
- प्रत्येक थांब्यावर किमीचा फोटो

आनंद लुटतो
^वेळ व वेग यांची ही स्पर्धा आहे, तरी वेगाचा छंद नाही. प्रवास, बाइक, राइड व इंजिनचा मनमुराद आनंद लुटणे हाच थ्रॉटलर्सचा मुख्य उद्देश आहे. संदीप मुळे, सदस्य.