आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी खा. मोरेश्वर सावेंना अखेरचा निरोप, मान्यवरांकडून आदरांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरेश्वर सावे यांची अंंजली सिनेमागृह येथून पुष्पनगरी स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात शहरवासीयांनी त्याना श्रद्धांजली वाहिली. - Divya Marathi
मोरेश्वर सावे यांची अंंजली सिनेमागृह येथून पुष्पनगरी स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात शहरवासीयांनी त्याना श्रद्धांजली वाहिली.
औरंगाबाद - शहराचे माजी महापौर, माजी खासदार तथा उद्योजक मोरेश्वर सावे यांना शुक्रवारी औरंगाबादकरांनी अखेरचा निरोप दिला. गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले होते. शुक्रवारी सकाळी पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव कमांडर अनिल सावे यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सावे यांना निरोप देण्यासाठी शहरातील राजकीय, सामाजिक, साहित्य, धार्मिक अशा सर्व वर्तुळातील मान्यवर उपस्थित होते.
अंत्यसंस्काराला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी खासदार पुंडलिकराव दानवे, आमदार संजय शिरसाट, नारायण कुचे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नामदेवराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कदम, उद्योजक राम भोगले, उल्हास गवळी, देवानंद कोटगिरे, केसरी पाटील, साहित्यिक बाबा भांड, जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, पालिका आयुक्त प्रकाश महाजन, माजी महापौर कला अोझा, डॉ. भागवत कराड, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, निवृत्त सनदी अधिकारी माधवराव कोकाटे, माजी महापौर रशीद खान, मनमोहनसिंग ओबेराय, किशोर पाटील, आमदार इम्तियाज जलील, माजी महापौर गजानन बारवाल, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजूरकर, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश या वेळी वाचून दाखवण्यात आला. केंद्र तसेच राज्यातील मंत्र्यांनीही सावे कुटुंबीयांसाठी शोकसंदेश पाठवल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सावे कुटुंबीयांनी शनिवारी रविवारी अशा दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ते या वेळेत खडकेश्वर येथील सावे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
बातम्या आणखी आहेत...