आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराडपुर्‍यात पाडापाडीच्या खुणा; पूर्वीचाच रस्ता बरा होता म्हणण्याची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रोशन गेट ते आझाद चौक हा रस्ता 40 मीटरचा करण्यात आला. पण सव्वा वर्ष लोटले तरी काम न झाल्याने पूर्वीचाच रस्ता बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. 300 मीटर अंतरावर हा रस्ता अक्षरश: लुप्त होतो.

न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळून उर्वरित रस्त्याचे काम करावे अशी मागणी आहे. त्यानुसार 2005 मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. आझाद चौकाकडून 300 मीटरपर्यंत चौपदरीकरण झाले. रुंदीकरण मोहीम हाती घेण्यात न आल्याने या रस्त्याचे काम अर्धवट राहिले. 2012 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रुंदीकरण मोहीम हाती घेत हा रस्ता 40 मीटरचा केला. लगेच काम हाती घेतले जाईल, ही डॉ. भापकर यांची घोषणा हवेतच विरली. पाडापाडीच्या काळात जुना रस्ताही इतिहासजमा झाला. त्यामुळे नवा झाला नाही व जुनाही गायब झाल्याने आणखी काही महिने तरी खड्डय़ांतून प्रवास करावा लागणार आहे.

यापूर्वी 2005 मध्ये आझाद चौकापासून 300 मीटरपर्यंत रस्त्याचे काम झाले होते. मात्र रुंदीकरण न झाल्याने काम अर्धवट राहिले. फेब्रुवारी 2012 मध्ये विकास आराखड्यानुसार रस्ता रुंद करण्यात आला. मात्र पुढे काम झाले नाही. पाडापाडीत आहे तो रस्ताही खराब झाला. त्यामुळे सव्वा किलोमीटरचा प्रवास खड्डय़ांतूनच करावा लागतो.

दरम्यान, कोर्ट प्रकरण संपल्यानंतर काम सुरू होईल, ही प्रशासनाची भूमिका चुकीची आहे. न्यायालयीन प्रकरण सोडून अन्य काम करण्यात यावे, यासाठी पत्र दिल्याचे विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी म्हटले आहे.

रस्त्याचे महत्त्व

शहागंज, सिटी चौकातून सिडकोकडे जाणारा एकमेव रस्ता. मिनिटाला 50 वाहने येथून धावतात. रिक्षांची सर्वाधिक वर्दळ.

असे आहे चित्र

1200 मीटर लांबी

40 मीटर रुंदी