आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांनी रचलेला भूखंडाचा डाव विरोधकांनी उधळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विद्यानगरमधील भूखंड नाशिकच्या संस्थेस कायमस्वरूपी विनामूल्य देण्याचा महापौर कला ओझा यांचा डाव विरोधकांनी हाणून पाडला. प्रशासनाने आठ महिन्यांनंतर इतिवृत्तात हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवल्यामुळे नगर सचिवांना सभागृहाची माफी मागावी लागली. प्रशासनाने विनामूल्य जागा देता येत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विरोधक शांत झाले.

महापौर कला ओझा यांनी स्वत:च्या विद्यानगर वॉर्ड क्रमांक 70, जयभवानी गृहनिर्माण संस्थेमधील मनपाची 586.20 चौ.मी. खुली जागा (सर्व्हे क्रमांक 17/1) नाशिक येथील अखिल भारतीय र्शी स्वामी सर्मथ गुरुपीठ न्यासामार्फत सुरू असलेल्या युवा व बालसंस्कार तसेच महिला सक्षमीकरण सार्वजनिक हिताचे काम करणार्‍या संस्थेस विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला होता. तसा ठराव 18 ऑक्टोबर 2012 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आला होता. आठ महिन्यांनंतर इतिवृत्तामध्ये तोच ठराव पुन्हा शुक्रवार, 21 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. ही बाब विरोधी पक्षाचे गटनेते अफसर खान, प्रमोद राठोड, राजू शिंदे, क ाशीनाथ कोकाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे महापौरांचा डाव फसला.

महापालिकेच्या मालकीची जागा विनामूल्य देण्यामागचे कारण काय काय, असा प्रश्न अफसर यांनी उपस्थित केला. 24 कोटींची जागा लाटण्याचा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा प्रमोद राठोड, राजू शिंदे, मिलिंद दाभाडे यांनी दिला. उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी विनामूल्य जागा देता येत नाही, असे स्पष्ट केले.