आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangbad Municipal Corporation Medical Officer In ICU

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आयसीयूत; डॉ. भोंडवे यांचा वाढला रक्तदाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी यांनी कर्मचार्‍यांसमोर अपमानास्पद भाषेत सुनावल्याने एक वैद्यकीय अधिकारी चक्कर येऊन पडल्या. त्यांचा रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना बुधवारी घडली. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

जवाहर कॉलनीतील मनपाच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भोंडवे यांच्याबाबतीत हा प्रकार घडला. डॉ. भोंडवे यांच्याकडे सोनोग्राफी विभागाचाही कार्यभार आहे. बुधवारी डॉ. जयर्शी कुलकर्णी रुग्णालयात आल्या व तेथे त्यांनी कामाच्या विषयावरून डॉ. भोंडवे यांना झापण्यास सुरुवात केली. अत्यंत अपमानास्पद भाषेत इतर कर्मचार्‍यांसमक्ष बोलल्याने डॉ. भोंडवे अस्वस्थ झाल्या. त्यांना चक्कर आली आणि त्या पडल्या. इतर सहकार्‍यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू केले. डॉ. भोंडवे यांचा रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी करून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली. प्रकरण गंभीर झाल्याचे लक्षात येताच डॉ. कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांशी चर्चाही केली.

आरोग्य विभाग अस्वस्थ : या प्रकारामुळे मनपाच्या आरोग्य विभागात अस्वस्थता पसरली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्याकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी याआधीही झाल्या आहेत. पण त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. मागील महिन्यात डॉ. चंद्रशेखर चव्हाण या आरोग्य अधिकार्‍यांनीदेखील राजीनाम्याची नोटीस दिली आहे.

सर्वांसमक्ष अपमान : डॉ. भोंडवे म्हणाल्या की, डॉ. कुलकर्णी यांनी अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली. माझी प्रकृती ठीक नाही, असे त्यांना सांगत होते तरीही त्यांनी अपमानजनक भाषा सुरूच ठेवली. त्यामुळे माझा रक्तदाब खूप वाढला. अस्वस्थ वाटू लागले.

वाद झालाच नाही : डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, डॉ. भोंडवे यांच्यासोबत वाद झालाच नाही. त्यांना ब्रेन ट्यूमरचा त्रास आधीपासून आहे. त्यांना सोनोग्राफी विभागाचे काम नको आहे. त्यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठवला आहे. आज घडलेल्या घटनेचा अहवाल मी आयुक्तांना दिला आहे.