आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची ऐशीतैशी - चारपैकी तीन खिडक्यांवर फक्त तत्काळ तर एका खिडकीवर सर्वसाधारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तत्काळ आरक्षणाच्या बदललेल्या नियमानुसार नवीन सेवेस मंगळवारपासून सुरुवात झाली, पण पहिल्याच दिवशी याठिकाणी दलालांचे मात्र चांगलेच फावले. मुख्य आरक्षण निरीक्षक के. शंकर यांनी तीन खिडक्यांवर केवळ तत्काळ आरक्षणाची सुविधा सुरू ठेवून फक्त एक क्रमांकाची खिडकी सर्वसाधारण आरक्षणासाठी सुरू ठेवली. रेल्वे विभागातर्फे अशा प्रकारे बदल करण्यासंबंधीचे आदेश नसताना नागरिकांच्या सोयीसाठी ऐनवेळी निर्णय घेतल्याचे शंकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, पण ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे फावले ते दलालांचे.
रेल्वे विभागाने दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी नवीन तत्काळ सेवेस 10 जुलैपासून देशभरात प्रारंभ केला. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आरक्षणाच्या चार खिडक्या आहेत. सकाळी 10 ते 10.30 पर्यंत तत्काळ सेवा देण्यात येते. अस्तित्वात असलेल्या आरक्षण खिडक्यांवर ठरलेल्या वेळेत तत्काळ तिकीट देण्याचे निर्देश आहेत. असे असताना शंकर यांनी स्वत:च्या स्तरावर एक खिडकी तत्काळ आरक्षणातून वगळून फक्त त्या खिडकीवर सर्वसाधारण आरक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
अशा प्रकारचा निर्णय घेताना त्यांना स्टेशन व्यवस्थापकाशी सल्लामसलत घेण्याची गरज वाटली नाही, पण या निर्णयामुळे फावले ते दलालांचे. खिडकीसमोरील नागरिक एका क्रमांकाच्या खिडकीवर गेल्याने त्यांची जागा दलालांनी घेतली. तसेच सर्वसाधारण आारक्षणासाठी आलेले सगळ्यांना एकाच खिडकीवर रांग लावली लागली, तर तत्काळसाठी मात्र तब्बल तीन खिडक्या सुरू होत्या.