आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जि.प. सीईओ बनकरांवर निवेदनांचा पाऊस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आठ दिवसांनंतर बुधवारी (12 जून) कार्यालयात पोहोचताच विविध पक्ष, संघटना, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर निवेदनांचा पाऊस पाडला. निवेदने देणार्‍यांची गर्दी वाढल्याने त्यांच्या दालनात बसण्यासाठीही जागा उरली नाही. त्यामुळे त्यांनी बाहेर येऊन निवेदने स्वीकारली. त्यांना एकूण 20 निवेदने देण्यात आली.

पत्नी आजारी असल्याने बनकर आठ दिवस रजेवर गेले होते. आज ते कार्यालयात आल्यानंतर विविध संघटना, पक्ष, कमचार्‍यांच्या मागण्या, सूचना, तक्रारी आदी निवेदने देण्यासाठी एकाच वेळी गर्दी केली होती.

एक निवेदन देताना सोबत किमान पाच ते सहा सदस्य हजर राहिल्याने त्यांच्या दालनात बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. परिणामी बनकर यांनी दालनाबाहेर येऊन सर्वांची निवेदन स्वीकारून त्यांचे समाधान केले.

सुटीच्या कालावधीत त्यांनी महत्त्वाच्या कामाच्या फायली पूर्ण केल्या. त्याच बरोबर इतर फायलीही त्यांनी वेळोवेळी मागोवा घेऊन निकाली काढल्याने पहिल्या दिवशी दैनंदिन फायलींव्यतिरिक्त एकही प्रलंबित फाइल नव्हती.