आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : औरंगपुर्‍यातील सोनोग्राफी सेंटर दक्षता पथकाकडून सील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगपुर्‍यातील डॉ. छाया पटेल यांच्या सोनोग्राफी सेंटरला विभागीय दक्षता पथक तसेच महापालिकेच्या पथकाने मंगळवारी रात्री सील ठोकले. येथे लिंगनिदान करून स्त्रीभ्रूणहत्या केली जात असल्याचा आरोप होता. सापळा रचून विभागीय दक्षता पथकाचे अँड. माधव मुंडे आणि निवृत्त पोलिस अधिकारी दौलतराव मोरे यांनी ही कारवाई केली.
विभागीय दक्षता पथकाने सापळा रचून एका महिलेस मध्यस्थ वैशाली हुसे यांच्यामार्फत डॉ. पटेल यांच्या सोनोग्राफी सेंटरवर पाठवण्यात आले. तपासणी करून लिंगनिदान करण्यासाठी सेंटरवर 23 हजारांची मागणी करण्यात आली. ते पैसे देण्यात आले. येथे लिंगनिदान होत असल्याची खात्री पटताच विभागीय दक्षता पथकाने छापा टाकला. लिंगनिदानासाठी देण्यात आलेल्या नोटांचे क्रमांक पथकाने अगोदरच नोंदवून ठेवले होते. त्या नोटा नंतर जप्त करण्यात आल्या.
कारवाईची माहिती मिळताच महापालिकेचे पथकही डॉ.पटेल यांच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये पोहोचले. यात जयर्शी कुलकर्णी, अशोक कांबळे, किरण पवार यांचा समावेश होता. लिंगनिदान होत असल्याची पूर्ण खात्री पटल्यानंतर विभागीय दक्षता पथक व महापालिकेच्या पथकाने डॉ. पटेल यांचे सोनोग्राफी सेंटर सील केले.

छायाचित्र - संग्रहित