आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive:आलेला प्रत्येक माणूस मला भेटल्याशिवाय जाणार नाही: जिल्हाधिकारी नवल किशोर राम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सामान्य माणूस काही तरी तक्रार घेऊन येतो. ती तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवली जाते. पुढे त्या तक्रारीचे काय होते, माहिती नाही. पण, हा प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येक अर्जाची जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद करून त्याची वेळोवेळी जबाबदारी निश्चित केली जाईल. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला प्रत्येक माणूस मला भेटल्याशिवाय जाणार नाही’, अशा शब्दांत नवनियुक्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्या कामाच्या शैलीबाबत विवेचन केले. 

जिल्हाधिकारी म्हणून जलसंधारण, पर्यटन उद्योग हे तीन मुख्य विषय राम यांच्या अजेंड्यावर असणार आहेत. याविषयी डीबी स्टारशी बोलताना ते म्हणाले, तक्रारी किंवा इतर अर्ज घेऊन आलेला प्रत्येक माणूस मला भेटेल. तशी व्यवस्था मी लावली आहे. व्हिजिटर्स जिथे बसतात, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. बाहेर व्हिजिटर्स किती बसलेत, हे पाहूनच मी दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करीन. भेटलेल्या माणसाने केलेल्या तक्रारीची मी नोंद ठेवणार आहे. माझ्या अध्यक्षतेखाली जवळपास २०० वेगवेगळ्या समित्या आहेत. संबंधित समितीच्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना त्या तक्रारीचे काय झाले, याबाबत विचारणा केली जाईल. आलेल्या अर्जांचे योग्य ट्रॅकिंग करून एक महिन्याच्या आत तक्रार निकाली काढण्यावर माझा भर असेल. त्यासाठी त्या त्या विभागाची अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.
 
पर्यटन वृद्धीवरभर देणार 
पर्यटन आणि उद्योग क्षेत्रामध्ये औरंगाबादचे नाव आहे. त्यामुळे या दोन्हीही क्षेत्रांवर आपला अधिक फोकस असेल. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनस्थळांवरील सुविधा, पर्यटनस्थळांचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले जाईल. त्यासाठी विशेष वेळ लक्ष ठेवण्यावर माझा भर असेल, असेही त्यांना स्पष्ट केले. 
 
शेतकरी अपघात विम्याबाबत लवकरच घेणार बैठक 
डीबीस्टारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याच्या प्रलंबित प्रकरणांवर बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, मी सध्या सर्व विभागांचा आढावा घेत आहे. लवकरच कृषी विभागासोबत बैठक होईल. त्या बैठकीमध्ये विमा कंपनीसोबत बैठक लावण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात येतील. 
 
बीड पेक्षाही अधिक क्षमतेने काम इथे करायचेय... 
बीड हा दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीत मोडतो. मात्र, आजघडीला तिथे केवळ सहा टँकर सुरू आहेत. मराठवाड्यातील या जिल्ह्यात टँकरमुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल केवळ जलसंधारणाच्या कामांमुळे शक्य झाली. या कामांना प्राधान्य दिले गेल्यामुळेच तेथील पाणीटंचाईची समस्या कमी होत आहे. बीडपेक्षाही अधिक क्षमतेने औरंगाबादमध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी योग्य ते नियोजन सुरू आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...