Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Aurya Chankya Vidyadham, Weakly Market , Student

आर्य चाणक्य विद्याधाम शाळेत भरतो आठवडी बाजार

विहंग सालगट . 8007868792 | Sep 24, 2011, 13:01 PM IST

  • आर्य चाणक्य विद्याधाम शाळेत भरतो आठवडी बाजार

तुम्ही आम्ही मोठमोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार भरताना पाहिले आहेत; पण एखाद्या शाळेत मुलांनी भरवलेला भाज्यांचा व दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करणारा बाजार पाहिला नसेल. असा आगळावेगळा प्रयोग जटवाडा परिसरातील आर्य चाणक्य विद्याधाम या शाळेत केला जात आहे. विद्यार्थ्यांना गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे तसेच केवळ पुस्तकी म्हणजेच सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळावे हाच त्यामागचा उद्देश आहे.
अशा आर्य चाणक्य विद्याधामसारख्या शाळा विरळच असतात. जेथे गणिताचीही खास प्रयोगशाळा पाहायला मिळते. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या या शाळेत रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे उपकरण मुलांसाठी प्रयोग म्हणून ठेवले आहेत. यात भाजी व अन्य वस्तू ज्या तराजुने मोजल्या जातात तो तराजू, भारतीय चलन, द्रवपदार्थ मोजण्याचे लिटरचे माप, मोजपट्टी तसेच काही महत्त्वपूर्ण चार्ट, घड्याळ यांचा समावेश आहे. विशिष्ट अंतराने विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळे सांकेतिक बाजार येथील प्रयोगशाळेत भरवले जातात. या बाजारात मुले मग प्रत्यक्ष पण सांकेतिक स्वरूपात खरेदीही करतात. त्यासाठी मुलांना भारतीय चलन दिले जाते. भाजी, किराणा वस्तू, तेल, दूध अशा दैनंदिन जीवनात लागणाºया वस्तू ही मुले या बाजारात पैसे देऊन घेतात. यातून त्यांना दोन प्रकारचे ज्ञान मिळते. एक म्हणजे वजन व मापांची माहिती मिळते. दुसरी म्हणजे पैशांचे आदान-प्रदान करणेही ही मुले शिकतात. येथील शिक्षकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळते. या अनोख्या प्रयोगामुळे ही मुले लवकर व विशेष रुची घेऊन शिकतात.
1000 रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश
विद्यार्थ्यांना सांकेतिक खरेदीसाठी 1-2 रुपयांपासून ते थेट 1000 रुपयांपर्यंतच्या नोटा दिल्या जातात. येथे प्रयोगशाळेत जेव्हा जेव्हा बाजार भरतो त्या त्या वेळी विद्यार्थी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात व प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नोटा घेऊन जातात. त्यातूनच त्यांना आपण किती रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या, त्यासाठी किती रुपयाची नोट दिली व दुकानदाराने उरलेले किती रुपये वापस दिले याचेही ज्ञान होते.
व्यावहारिक ज्ञानासाठीच
> विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैद्धांतिक म्हणजेच व्यावहारिक ज्ञान मिळणेही आवश्यक आहे. त्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने अशी प्रयोगशाळा उभारली आहे. जेथे हा सांकेतिक बाजार भरवला जातो. ज्यातून खरोखरच खूप शिकायला मिळते. सोबतच गणित विषयाशी संबंधित अन्य व्यावहारिक ज्ञानही त्यांना मिळते.
मदन तसेवाल, जनसंपर्क अधिकारी, आर्य चाणक्य विद्याधाम.

Next Article

Recommended