आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ट्रेनर देणार विद्यापीठात प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पीएचडी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊनही संवाद कौशल्याअभावी मुलाखतीत मागे पडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आता एक आॅस्ट्रेलियन ट्रेनर येणार आहे. दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून ही ट्रेनर उन्हाळ्याच्या या मुलींना सुटीत विनामूल्य संभाषण कौशल्य अणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देणार आहे. साेबतीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टडी मटेरियलही मिळणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर वर्गापासून एमफिल आणि पीएचडीसाठी विद्यार्थी येतात. अत्यंत मानाच्या या पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु नोकरीच्या जगतात मुलाखतीला सामोरे जाताना मुलांची कुचंबणा होते. विशेषत: इंग्रजीतील मुलाखतीत ही मुले कच खातात. विषयातील ज्ञान असतानाही केवळ इंग्रजी आणि एकूणच संभाषण कौशल्याच्या अभावी ते मागे पडतात. दिशा इंटरनॅशनल फाउंडेशनचे ट्रस्टचे संचालक किरॉन वैष्णव यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठातील वसतिगृहातल्या मुलींसाठी आरोग्याच्या चांगल्या सवयी शिकवणारी एक कार्यशाळा घेतली होती. यावेळी त्यांना मुलींचे संभाषण कौशल्य कच्चे असल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांनी मुलींचे संभाषण कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी खास प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. किरॉन यांच्याकडे २५ देशातील नागरिक भारतात समाजसेवेत सहभागी होण्यासाठी येतात. किरॉन यांनी ही बाब आपल्या वेबसाइटवर टाकली. त्यास प्रतिसाद देत जगभरातून अनेक जणांनी त्यांच्याकडे औरंगाबाद येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातून किरॉन यांनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि लंग्वेज ट्रेनर ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टीयाना अंडलबोरर्स यांची निवड केली. हा कार्यक्रम राबवण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सुहास मोराळे यांनी लगेच मंजूरी दिली.

मुलाखतीतून निवडल्या विद्यार्थिनी
यात सहभागी होण्यासाठी किरॉन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या. त्यांना ६० मुली अपेक्षित असताना ३२५ अर्ज आले. मुलींची लेखी आणि तोंडी चाचणी घेतली. त्यांच्या क्षमतेनुसार ६० मुलींची बिगिनर, इंटरमिजिएट आणि अॅडव्हान्स्ड अशा तीन कोर्सेससाठी निवड केली. एका बॅचमध्ये २० मुली आहेत. दोन महिने संध्याकाळी ते दरम्यान हे प्रशिक्षण चालणार आहे. यासाठी क्रिस्टियाना यांनी अभ्यासक्रम तयार केला आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून त्यात टिपिकल क्लासरूम लेक्चरसह नाच, गाणी, खेळांचा समावेश असेल. संपूर्ण प्रशिक्षण अॅक्टिव्हिटी बेस्ड राहणार आहे.

हे खरे स्किल डेव्हलपमेंट
ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुलींसाठी संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्किल डेव्हलमेंटचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ६० मुलींना प्रवेश असला तरी हळूहळू सर्वच मुलींना यात ट्रेन करू. आमच्या दृष्टीने हेच खरे स्किल डेव्हलपमेंट आहे. किरॉन वैष्णव, अध्यक्ष,दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट