आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्य संपन्न होण्यासाठी खूप पुस्तके वाचा : रेखा बैजल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तुमचं आयुष्य, भविष्य अन् सुसंस्कृतपणा सर्व तुमच्याच हाती आहे. पुस्तके हे संस्कार देण्याचे आणि समाजात सक्षमपणे उभे राहण्यासाठी मदत करतात. तेव्हा आयुष्य संपन्न होण्यासाठी खूप पुस्तके वाचा. चांगल्या वाचनानेच उत्तम लेखक आणि उत्तम माणूस तयार होतो. समृद्ध वाचनातून यशाचा मार्ग मिळतो, असे मत लेखिका रेखा बैजल यांनी व्यक्त केले.
बुधवारपासून सरस्वती भुवन विद्यालयाच्या प्रांगणात तीनदिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद व सरस्वती भुवन प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. बैजल म्हणाल्या, पुस्तके हीच विविध टप्प्यांवर मार्ग काढायला शिकवतात. परंतु आज दूरचित्रवाणी, व्हिडिओ गेम खेळण्यात वेळ वाया घातला जातो, वाचनाकडे दुर्लक्ष केले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी वाचनाचेही ग्रेड आता ठरवायला हवेत. ललित, माहितीपर, तात्त्विक अशा प्रकारातील वाचनापुरतेे मर्यादित न राहता प्रत्येक कलेविषयीचे वाचन करा, त्याची अनुभूती घ्या, मिळालेला क्षण वाया घालू नका, क्षण जगायला शिका, वाचायला शिका. कारण एक पुस्तक तुमच आयुष्य बदलू शकते, असेही बैजल यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर होते. शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे, शिवकुमार बैजल, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, भगवान सोनवणे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, एस. पी. जवळकर, मधुकरअण्णा वैद्य, ज्ञानप्रकाश मोदाणी, व्यंकटेश कोमटकर, अरविंद कापसे, विलास केवट यांची उपस्थिती होती.
ग्रंथदिंडीतून विद्यार्थ्यांनी दिला "वाचाल तर वाचाल'चा संदेश-
सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीचे उद््घाटन िशक्षणाधिकारी भगवान सोनवणे, स.भु.संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी िवद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय वेशभूषा केली होती. विठुमाउलीचा गजर, ढोल,लेझीम आणि बंॅड पथकासह घोषणांनी परिसर दणाणला. फुलांच्या माळेत सजलेल्या ग्रंथदिंडीचा समारोप जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या मैदानावर झाला.यात ४८ शाळांच्या सुमारे हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माझी माय सरस्वती, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, वाचाल तर वाचाल, एक पुस्तक एक मित्र म्हणून जोडा, असा संदेश या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला.