आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलनंतर आता रिक्षा भाडेवाढीचे संकट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता रिक्षांच्या प्रवासी दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली असल्याने औरंगाबादकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार हे स्पष्ट झाले आहे. 20 जून 2011 रोजी रिक्षाच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असून एका किलोमीटरमागे किमान 13 रुपयांनी वाढ करण्यात यावी, अशी मागणी लाल बावटा संघटनेचे बुद्धिनाथ बराळ यांनी केली आहे.
इकडे रिक्षाचालक संघटनेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक बोलावली असून त्यात योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र दरवाढ झाली नाही तर आम्ही जगूच शकत नाही, अशी भूमिका रिक्षाचालकांनी घेतली असल्याने दरवाढ अटळ असल्याचे बोलले जाते.
सध्या पहिल्या 1 किलोमीटरसाठी 12 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 8 रुपये मोजावे लागतात. यात थेट अनुक्रमे 13 आणि 7 रुपयांची वाढ करावी, अशी संघटनेची मागणी आहे. त्यांची मागणी 50 टक्के जरी पूर्ण झाली तरी औरंगाबादकरांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
- यापूर्वी झालेली दरवाढ - 20 जून 2011
- तेव्हाचे पेट्रोलचे दर - 65 रुपये प्रतिलिटर
- तेव्हाचे दर पहिल्या किलोमीटरसाठी 12 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 8 रुपये.
- आता रिक्षाचालकांची मागणी - पहिल्या किलोमीटरसाठी 25 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरला 13 रुपये.
* 2011 मध्ये दरवाढ झाली तेव्हा पेट्रोलचे दर 65 रुपये प्रतिलिटर होते. आता हे दर 27 रुपयांनी वाढून 80 च्या पुढे गेले आहेत. त्यामुळे जुने दर रिक्षाचालकांना परवडत नाहीत. आम्ही तिसर्‍यांदा मागणी केली आहे. बुद्धिनाथ बराळ, लाल बावटा संघटना.
* रिक्षाचालकांककडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक बोलावली जाईल. त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल. दरवाढ होईल की नाही किंवा झाली तर ती किती असेल हे सांगता येत नाही. -विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.