आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांची दंडेली, प्रवाशांची कोंबाकोबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सुरक्षा पंधरवड्यानिमित्त पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले होते. त्यानंतर काही रिक्षाचालकांवर थातूरमातूर कारवाई करून ही मोहीम थांबवण्यात आली. रिक्षाचालक प्रवाशांच्या हाताला धरून रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा महिला आणि विद्यार्थिनींचा हात धरून त्यांना रिक्षात बसण्याचा आग्रह केला जातो. तसेच रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून धोकादायक वाहतूक केली जात आहे.
(सर्व छाया : रवी खंडाळकर)