आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवल्यामुळे अपघात, तरुणी जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मद्यधुंद चालकाने भरधाव रिक्षा चालवल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणी जखमी झाल्या. रविवारी दुपारी सव्वाचार वाजता सिडको बसस्थानकाकडून सेव्हन हिल्स उड्डाणपुलाकडे जाताना खंडपीठाशेजारील न्यायमूर्ती निवासस्थानाजवळ रिक्षाने हातगाडीला धडक दिली व रिक्षा उलटली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

महाविद्यालयीन तरुणी व महिला प्रवाशांना रिक्षामध्ये (एमएच 20 डब्ल्यू 4285) बसवून रिक्षाचालकाने वेगाने रिक्षा दामटण्यास सुरुवात केली. रिक्षाचालक मद्यधुंद असल्याने त्याचा रिक्षावरील ताबा सुटला व हातगाडीला धडक लागून रिक्षा उलटली. अपघातात अदिती चांदेकर व दुसरी एक तरुणी जखमी झाली. अपघातानंतर तातडीने मदतीला कोणीही धावले नाही, परंतु महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये पाचवीत शिकणारा संकल्प सोमाणी व त्याच्या वडिलांनी त्या तरुणींना धीर देत मदत केली. अपघातानंतर बराच वेळ रिक्षाचालक घटनास्थळी पडून होता. नंतर तो निघून गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.