आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोगिअर, स्पोर्टी लूक गाड्यांना पसंती, यंदा गुढीपाडवा खरेदीत स्मार्ट कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदाच्या पाडवा मुहूर्तावर ४० टक्के औरंगाबादकरांनी नव्या ट्रेंडला पसंती दिल्याचे विविध कंपन्यांच्या कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर साहित्याच्या वितरकांकडील चौकशी बुकिंगवरून दिसले. नामांकित कार कंपन्यांनी मध्यमवर्गाला परवडेल अशा दरात ऑटोगिअर, स्पोर्टी लूकच्या विविधढंगी कार पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात आणल्या आहेत. या शुभमुहूर्तावर होणाऱ्या गृहखरेदीलाही नावीन्याचे तोरण लाभले आहे. यंदा फ्लॅट किंवा घराच्या अंतर्गत सजावटीला जास्त महत्त्व आले आहे. सोने व्यापारांचा बंद असल्याने पाडव्याची खरेदी इलेक्ट्रॉनिक्स बाजार, गाड्या आणि घराकडे वळली आहे.

देशातील आघाडीच्या कार कंपन्यांनी यंदा किफायतशीर दरात ऑटोगिअरच्या कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. कार बाजारातील हा नवा ट्रेंड ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. विविध ड्रायव्हिंग मोड, आकर्षक डिझाइन, मनमोहक रंग स्पोर्टी लूक असणाऱ्या कारना विशेष पसंती मिळते आहे. गेल्या वर्षी हॅचबॅक कारना सर्वाधिक पसंती मिळाली होती. सेडान कारलाही मागील वर्षी चांगली मागणी होती. यंदा सर्वाधिक पसंती ऑटोगिअर सुविधेसह आकर्षक स्पोर्टी डिझाइनच्या कारला आहे. प्रवासी कारसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका नामांकित कंपनीने आपल्या नव्या हॅचबॅक मॉडेलमध्ये इको आणि सिटी असे दोन ड्राइव्ह मोड दिले आहेत. ही कार लिटरमागे २४ किलोमीटर मायलेज देते, असा दावाही कंपनीने केला आहे. या कारची किंमत ३.२० लाख ते लाख असून या ८० कारचे बुकिंग झाल्याचे स्थानिक वितरकांनी सांगितले. स्पोर्टस युटिलिटी कारसाठी विख्यात असलेल्या कंपनीने नव्या स्पोर्टी लूकची देखणी कार आणली आहे. एकाच जागी थांबल्यास १० सेकंदानंतर इंजिन आपोआप बंद होते नंतर क्लच दाबताच सुरू होते हे याचे मुख्य वैशिष्ट्य. स्टेअरिंगवरही स्पीड सेटिंग, इको आणि सिटी मोड असणारा एसी आदी सुविधा असणाऱ्या या कारला मोठी मागणी आहे. प्रवासी कार बाजारपेठेत आघाडीच्या एका कंपनीने सहा मॉडेलसह नवी कार सादर केली आहे. प्रोजेक्टर हेड लॅम्प, सुझुकी टेक सुरक्षा व्यवस्था, मूडनुसार डिस्प्ले कलर सेटिंग, टचस्क्रीन अॅपल कार प्ले, आणि व्हॉइस कमांड ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. आजपर्यंत १२० जणांनी या कारचे बुकिंग केले असून १५ जणांच्या दारात पाडव्याच्या दिवशी ही कार उभी राहणार आहे. गेल्या वर्षी १०० पैकी पाच ते सात ग्राहक स्पोर्टी लूकच्या कारचा आग्रह धरत होते. आता हे प्रमाण ४० टक्क्यांवर गेले आहे.

आकर्षक फॉलसिलिंगवर भर : यं फॉलसिलिंगसह अद्ययावत सुविधा असणाऱ्या फ्लॅटना मागणी आहे. जागा कमी असली तरी उत्तम सजावट असलेल्या फ्लॅटसना विशेष पसंती मिळते. त्यामुळे फॉलसिलिंग करूनच फ्लॅट किंवा रो हाऊस विक्री करतो, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. उन्हाळ्यामुळे कुलर्सची मागणी वाढली आहे. ब्रँडेड उत्पादनांकडे ग्राहकांचा कल आहे. टी.व्ही., रेफ्रिजरेटर एसी खरेदीवर शून्य व्याजदरात कर्ज उपलब्ध असल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांचा त्यावर भर आहे. बारा अथवा दहा हप्त्यात परतफेडीचा पर्याय मिळाल्याने सुमारे ४० टक्के ग्राहकांनी हा पर्याय निवडला आहे. ३०० लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या रेफ्रिजरेटरला मागणी असून स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीला प्राधान्य दिले आहे. वर्षभरात केवळ १५८ ते २४५ युनिट विजेचा वापर करणाऱ्या रेफ्रिजरेटरकडे ग्राहकांचा कल आहे. यामुळे ६० टक्के वीज बचत होते, असा दावा वकंपन्यांनी केला आहे. एसीबाबतही हाच ट्रेंड आहे.

यंदा२५ टक्के वाढ : बाजारपेठेत मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के वाढ आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या वस्तूंना पसंती मिळत आहे. नगदी खरेदीकडे आेढा असला तरी ४० टक्के ग्राहक विविध वित्तीय संस्थांमार्फत अल्प मुदतीचे कर्ज घेऊन खरेदी करतात असे पंकज अग्रवाल यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी
इलेक्ट्रॉनिक्सबाजारपेठेत स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वस्तू खरेदीकडे शहरवासीयांचा कल आहे. टीव्ही, कूलर्स, रेफ्रिजरेटर, एसी इतर वस्तू खरेदीत ग्राहक नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहेत. विजेची बचत करणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी असून कंपन्यांनी ही गरज आेळखूनच आपली उत्पादने बाजारपेठेत दाखल केली आहेत.