आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Autorickshaw Plunder Of Passengers In Aurangabad

अॅपेरिक्षात बसणे हा प्रवाशांचा नाइलाज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील कामगार इतर प्रवासी अॅपेरिक्षा चालकांच्या दादागिरीला कंटाळले आहेत. अरेरावीची भाषा करून ते प्रवाशांकडून अधिक भाडे आकारत आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस कमी असल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना या अॅपेरिक्षांमधून प्रवास करावा लागत आहे.

वाळूज महानगरातील १८ गावांची मिळून लोकसंख्या तीन लाखांवर गेली आहे. राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी बसेसची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही. अशा वेळी नाइलाजाने प्रवाशांना अॅपेरिक्षातून प्रवास करणे भाग पडते. वाळूज भागात अशी दीडशेंवर वाहने धावत आहेत. वाहनांत मेंढरासारखे प्रवासी कोंबले जातात. अॅपेरिक्षा वेगात जात असल्याने पाहिजे तेथे थांबत असल्याने प्रवासी त्यातून प्रवास करताना दिसतात. त्यामुळे अनेक वेळा लहान-मोठे अपघात होतात. अॅपेरिक्षाचालक प्रवासी वाहनात बसेपर्यंत त्यांना आदराने बोलतात. एकदा वाहन भरून पुढे निघाले की त्यांची दांडगाई सुरू होते. ज्येष्ठ नागरिक, महिलांना उर्मटपणे बोलून त्यांचा अपमान करतात.
रस्त्यावर थांबवून प्रवाशांचा भरणा
अॅपेरिक्षाचालकप्रवासी खचाखच भरून वाहने पळवतात. दोन वाहनांमध्ये प्रवासी घेण्यावरून जीवघेणी स्पर्धा सुरू असते. पुढे निघण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. बहुतेक वेळा चालकांमध्ये वाद होऊन हाणामाऱ्याही होतात. प्रवासी भरताना वाहन रस्त्याच्या बाजूला लावता रस्त्यावरच थांबवून प्रवासी भरले जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो. अनेक अॅपेरिक्षांवर अल्पवयीन मुले चालक आहेत. अनेकांकडे चालक परवाना नाही. त्यामुळे अशा वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे. एसटी संघर्ष, महत्त्वकांक्षा आणि महामंडळाने बसच्या संख्येत वाढ केल्यास खासगी वाहनांमध्ये कोणीही प्रवास करणार नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रत्येक मार्गाचे भाडे आणि कशी होते प्रवाशांची लूट...