आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस आरटीओ अन्यायकारक निर्णयाविरोधात रिक्षाचालकांचा २१ मार्चपासून संप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आरटीओ कार्यालयातर्फे रिक्षाचालकांविषयी घेण्यात आलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे २१ ते २३ मार्चदरम्यान संप पुकारण्यात आला आहे. २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आरटीओ कार्यालय, २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्त, तर २३ मार्च राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य झाल्यास बंद पुढे कायम ठेवण्यात येईल. २० मार्च रोजी आयटक कार्यालय, कामगार कॉलनी, खोकडपुरा येथे सकाळी ११ वाजता बैठक होईल. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बुद्धिनाथ बराळ, गजानन वानखेडे, राजू देहाडे, राजेश रावळकर यांनी केले आहे. लाल बावटा, भ्रष्टाचारविरोधी रिक्षाचालक संघटनेने बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
बातम्या आणखी आहेत...