आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांच्या तारखा, निकाल ‘अॅप’वर, एमकेसीएलच्या मदतीने विद्यापीठाचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टफोनच्या‘अॅप्स’नी मोठी संवाद क्रांती केली आहे. वाट्टेल ती माहिती एका ‘टॅप’वर आपल्याला मिळणे सहज शक्य झाले आहे. नेमकी हीच गोष्ट हेरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही एमकेसीएलच्या मदतीने विद्यार्थ्यांना अकॅडमिक कॅलेंडरसह त्यांच्या हिताची माहिती स्मार्टफोनवर उपलब्ध करून देणार आहे. १६ ऑगस्टच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत हा विषय मंजूर झाल्यास वर्धापन दिनापासून (२३ ऑगस्ट) विद्यार्थ्यांना ‘टॅप’ करता येईल अशी विद्यापीठाची तयारी आहे.

तरुणांमध्ये सध्या ‘अॅप्स’ डाऊनलोड करून सर्व माहिती आपल्या कवेत करून घेण्याची जबरदस्त क्रेझ आहे. शिवाय भिन्न-भिन्न प्रकारच्या ‘अॅप्स’ची माहिती एकमेकांसोबत शेअर करण्याकडेही तरुणांचा कल आहे. विद्यापीठानेही ‘अॅप्स’चा ट्रेंड ओळखून पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एमकेसीएलची मदत घेतली जाणार आहे. मंगळवारी (४ ऑगस्ट ) दुपारी दिवसभर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन ठिकाणी एमकेसीएलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी एमकेसीएलच्या अधिकाऱ्यांना कुलगुरूंसमोर प्रेझेंटेशन केले आहे. विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अतिरिक्त सेवा दिली जाईल याचे प्रेझेंटेशन पाहून कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, यासाठी व्यवस्थापन परिषदेची मंजुरी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. उस्मानाबाद उपकेंद्राच्या वर्धापनदिनी (१६ ऑगस्ट) होत असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरू ‘अॅप’चा प्रस्ताव ठेवणार असून मंजूर झाल्यास विद्यापीठाच्या वर्धापन दिनापासून एमकेसीएल ‘अॅप’ची सेवा देण्याच्या तयारीत आहेत. परीक्षा विभागातील बैठकीत डीएड, बीएड, बीपीएड, एमपीएड आणि विधी विभागाच्या परीक्षांचे निकाल एमकेसीएलची सेवा घेऊनच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला कुलगुरूंसह बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रभारी वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन आणि एमकेसीएलचे प्रादेशिक समन्वयक बालकिशन बलदवा आदींची उपस्थिती होती. या निर्णयाचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

सार्वजनिक सुट्यांची मिळेल माहिती
‘अॅप’मध्येविद्यापीठाचे संपूर्ण अकॅडमिक कॅलेंडर दिले जाईल. ज्यामध्ये महाविद्यालये विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या तारखेपासून, तर परीक्षा संपेपर्यंतचे वेळापत्रक राहणार आहे. त्यानंतर निकालाची तारीखच नव्हे, तर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे निकालदेखील मोबाइल अॅपद्वारे दिले जातील. प्रशासनाचे कॅलेंडर ज्यामध्ये सार्वजनिक सुट्या, विविध माहितीचा समावेश असेल. नोकरीच्या संधी, जाहिराती, भरती मेळावा, कॅम्पस इंटरव्ह्यू, एज्युकेशन फेअर, सीईटी, नेट-सेट-पेट परीक्षांच्या तारखाही ‘टॅप’वर उपलब्ध होतील.
बातम्या आणखी आहेत...