आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शाखा पदवी उत्तीर्ण तरुणाने घेतला गळफास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - न्यू हनुमाननगरातील बी. एस्सी. उत्तीर्ण झालेल्या तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल सावळाराम खरात (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विशाल हनुमाननगरातील गल्ली क्रमांक चारमध्ये कुटुंबासह राहत होता. विशालने बी. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले होते. विशालचे वडील कंपनीत नोकरीला होते. विशालसह त्यांना आणखी एक मुलगी असून तिचे लग्न झाले आहे, परंतु विशाल अविवाहित असून आई-वडिलांना तो एकुलता एक होता. भाजपच्या एका कार्यालयात तो ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. सोमवारी विशाल दिवसभर घरातच होता. सायंकाळच्या सुमारास घराच्या बाजूला असलेल्या एका छोट्या खोलीत तो गेला होता. त्याने दाराची आतून कडी लावली आणि लहान मुलाच्या झोक्यासाठी बांधलेल्या दोरीने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी विशाल बाहेर आल्याने त्याच्या आईने खोलीत डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. आईने आरडाओरड करताच शेजारी धावत घटनास्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडला. फासावर लटकलेल्या विशालचा मृतदेह घाटीत नेण्यात आला, पण डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...