आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी.रघुनाथ स्मृतिसंध्या : मराठी माणूस चित्रकलेपासून दूरच राहिला - वसंत डहाके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चित्रकलेविषयीच्या पुस्तकास बी. रघुनाथ हा पुरस्कार देण्यात आला हे विशेष आहे. चित्रकलेपासून मराठी माणूस दूर राहिला आहे. चित्रकलेबाबत आपण साक्षर नाही. अजिंठ्याची चित्रकला ही आपल्याकडे असणारी मोठी शिदोरी आहे. पारंपरिक कलांमधून चित्रकला जोपासली जाते. जाणकार, रसिकांपर्यंत ही कला पोहोचली पाहिजे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष, कवी वसंत डहाके यांनी व्यक्त केले.

नाथ ग्रुप, परिवर्तन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी, सप्टेंबर रोजी आयोजित ज्येष्ठ लेखक, कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त बी. रघुनाथ स्मृतिसंध्या हा कार्यक्रम तापडिया नाट्यमंदिरात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. डहाके यांच्या हस्ते सुहास बहुळकर यांना ‘बॉम्बे स्कूल : आठवणीतले, अनुभवलेले’ या पुस्तकासाठी बी. रघुनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सुहास बहुळकर, नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, डॉ. सुनील देशपांडे, प्रा. अजित दळवी यांची उपस्थिती होती.

डहाके म्हणाले, या पुस्तकातून बहुळकरांच्या कष्ट आणि प्रतिभेचे दर्शन होते. या पुस्तकाला सांस्कृतिक महत्त्व आहे. चित्रकलेचे एक वेगळे दालन बहुळकरांच्या पुस्तकात असल्याचे त्यांनी सांगितले. मनोगत व्यक्त करताना बहुळकर म्हणाले, बी. रघुनाथ यांचे लेखन थक्क करणारे आहे. त्यांच्या लेखनात सातत्य आणि संवेदनशीलता होती. कला निर्मितीला कारुण्याची किनार असते. याचा प्रत्यय या पुस्तकात येतो, असेही ते म्हणाले. प्रा. अजित दळवी यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मीकांत धोंड यांनी सूत्रसंचालन केले. शिवशंकर फाळके यांनी आभार मानले.

‘सनविवि’ने रसिक मंत्रमुग्ध
पुरस्कार वितरणानंतर ‘सप्रेम नमस्कार विनंती विशेष’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम स्पृहा जोशी आणि कौशल इनामदार यांनी उत्कृष्टरित्या सादर केला. त्यांना मंदार गोगटे यांनी साथ दिली. कविता, गाणी आणि संवाद यामुळे ‘सनविवि’ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या वेळी ‘वासाचा पहिला पाऊस अयला...,’ या रचनेतून त्यांनी प्रारंभीच पावसाचे मनोहर रूप रसिकांसमोर उलगडले. ‘माझ्या अंगणात पहिला पाऊस आला...’ ही कवितेला प्रेक्षकांची दाद मिळाली. कलावंतांचा परिचय प्रा. दासू वैद्य यांनी करून दिला.
तापडिया नाट्यमंदिरात आयोजित बी. रघुनाथ स्मृतिसंध्या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध कवी वसंत डहाके यांच्या हस्ते सुहास बहुळकर यांना बी. रघुनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रंसगी नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, डॉ. सुनील देशपांडे, प्रा. अजित दळवी यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...