आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश विदेशातील कोट्यवधी लोकांना प्रभावित करणाऱ्या बी. के. शिवानी बुधवारी मार्गदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मागील वर्षांपासून ‘अवेकनिंग विथ ब्रह्मकुमारीज’ या श्रृंखलेच्या माध्यमातून देश विदेशातील कोट्यवधी लोकांना प्रभावित करणाऱ्या बी. के. शिवानी मे (बुधवार) रोजी ‘बॅलन्सशीट ऑफ लाइफ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६.१५ ते ८.१५ दरम्यान हा कार्यक्रम होईल, अशी माहिती विवेक रांदड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बी. के. मंगलादीदी, बी. के. शीलादीदी, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांची उपस्थिती होती. 

रांदड म्हणाले, सिस्टर शिवानी यांनी आपल्या अमोघ वाणीतून इतरांमध्ये प्रेरणा भरण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. आज जगभरात त्यांच्यामुळे प्रभावित झालेल्यांची संख्या कोट्यवधीत आहे. नुकतेच वर्ल्ड सायकियाट्रिक असोसिएशनने त्यांची गुडविल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. अाध्यात्मिक सशक्तीकरणासाठी ‘वुमन ऑफ डिकेड’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मे गुरुवार रोजी सकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे. याशिवाय शिवानींच्या हस्ते चेतना एम्पॉवर फाउंडेशनच्या मेडिटेशन सेंटरचे उद््घाटनही करण्यात येणार आहे. 

नावनोंदणी आवश्यक 
बी.के. शीलादीदी म्हणाल्या, या कार्यक्रमासाठी १५ हजारांची उपस्थिती अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवणाऱ्या या कार्यक्रमाचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा. यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. औरंगाबादेत ब्रह्मकुमारीची १४ केंद्रे आणि हजार अनुयायी आहेत. 
बातम्या आणखी आहेत...