आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baba Saheb Ambedkar Birth Anniversary Preparation Start

आता भीमजयंती मिरवणुकीत "टू वे' साउंड सिस्टिमचा गजर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विश्वरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत डीजे साउंड सिस्टिम लावायची की नाही, यावर गेल्या सहा दिवसांपासून पोलिस प्रशासन आणि भीमजयंती आयोजकांत काथ्याकूट सुरू होता. अखेर "टू वे' साउंडला परवानगी देण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आयोजकांची नाराजी थोडी कमी झाली.
गेल्या सहा दिवसांपासून डीजे नव्हे पण फोर वे स्पीकरची तरी परवानगी द्यावी, असा आग्रह आयोजकांनी आयुक्तांकडे धरला होता. शेवटी या सर्व साउंड सिस्टिमची चाचणी घेऊनच परवानगी देण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार सोमवारी पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर डीजे, फोर वे आणि टू वे साउंड सिस्टिमची चाचणी घेतली. यात डीजेचा आवाज ८४.४, फोर वेचा आवाज ८३.९ तर टू वेचा आवाज ५५ डेसिबलच्या टप्प्यात गेला. त्यामुळे आयुक्तांनी टू वेलाच परवानगी देण्याचे स्पष्ट केले.

डीजेजॉकींना पाचारण : पोलिसआयुक्तांनी सोमवारी सकाळी पोलिस आयुक्तालयाच्या आवारात शहरातील डीजेचा व्यवसाय करणाऱ्या जॉकींना बोलावले होते. डीजे असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर बाेरसे यांनी चाचणी घेण्यासाठी वाहनांत लावलेली डीजे, फोर वे आणि टू वे अशा सर्व साउंड सिस्टिम वाजवून दाखवल्या. आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटुळे, राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, चंपालाल शेवगण यांच्या उपस्थितीत क्रमाक्रमाने सर्व सिस्टिमचीचाचणी घेतली तेव्हा डीजेचा आवाज ८४.४, फोर वे ८३.९ आणि टू वेचा आवाज ५५ डेसिबल अशी नोंद घेण्यात आली.

अखेर मोर्चा मागे : डीजेच्याचाचणीनंतर पोलिस आयुक्तांच्या दालनात भीमजयंतीच्या आयोजकांची पुन्हा एकदा बैठक झाली. टू वेचा आवाज ५५ डेसिबलपर्यंतच असल्याने ही सिस्टिम वाजवण्यास हरकत नाही, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. हा निर्णय मान्य करत आयोजकांनी पोलिस आयुक्तांच्या विरोधात १२ एप्रिल रोजी काढण्यात येणारा मोर्चाही रद्द केला, अशी माहिती कृष्णा बनकर, गौतम खरात, राजू शिंदे, मिलिंद दाभाडे, दिनकर ओंकार, अमित भुईगळ, रूपचंद वाघमारे, मुकुंद सोनवणे, किशोर थोरात, पंकज बोरोडे, मनोज वाहुळ, सतीश गायकवाड, गौतम लांडगे, बंडू काकडे, श्रावण गायकवाड, विजय वाहूळ यांनी दिली.
डीजेच्या आवाजाची तीव्रता मोजताना आयुक्त अमितेशकुमार. छाया : रवी खंडाळकर
{ यामुळे वाद : डीजेवाजवता येणार नाही असा निर्णय पोलिस आयुक्तांनी सहा एप्रिलच्या शांतता समिती बैठकीत दिल्यानंतर काही आयोजक आयुक्तांच्या दालनात गेले होते. तेव्हा माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांना "तुम्हाला काय वेगळे सांगावे लागेल का' असे शब्द आयुक्तांनी वापरल्याने वादाला सुरुवात झाली.

१. आक्षेप : सर, तुमचे अधिकारी तुमचे नाव सांगून दादागिरी करतात...
आयुक्तांचे उत्तर : असेमोघम बोलून चालणार नाही. कुठल्या पोलिस ठाण्यात असा प्रसंग घडला ते सांगा, त्यानुसार चौकशी केली जाईल.
२.आक्षेप : पोलिसांचे काम असेल तर ते बोलवून घेतात. मात्र आम्ही विनंती केली तर ऐकत नाहीत.
आयुक्तांचे उत्तर : प्रत्येकव्यक्तीने पोलिसांना सहकार्य करावे हे कर्तव्यच आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींवर तर अधिक जबाबदारी आहे. आपण चांगल्या कामासाठी विनंती करत असाल तर पोलिस चार पावले पुढे येतील.
३.आक्षेप : सामाजिक काम करताना अनेक राजकीय गुन्हे दाखल होतात. अशा वेळी आपले अधिकारी आणि तुम्हीसुद्धा किती गुन्हे दाखल, असे विचारता...
आयुक्तांचे उत्तर : मान्यआहे. आपण गुन्हेगार नाही, मात्र पोलिसांचा आणि चौकशीचा भाग आहे. मन दुखवणे असा त्यामागचा हेतू नसतो. राजकीय गुन्ह्यांचा निकाल लावण्यासाठी स्वतंत्र कमिटी आहे.

काय आहे फरक ?
{डीजे : फोरवे आणि टू वे यांचे एकत्रीकरण करून लावलेल्या संचाला डीजे साउंड असे म्हणतात. साधारपणे डीजेचा आवाज ८५ डेसिबलपेक्षा अधिक असतो.
{फोर वे : चारस्पीकर एकत्र करून बनवलेल्या संचाला फोर वे असे म्हणतात. या सिस्टिमचा आवाज ८३ डेसिबलपर्यंत असतो.
{टू वे : दोनस्पीकर एकत्र करून निर्माण केली जाणारी यंत्रणा म्हणजे टू वे. आवाज ५५ डेसिबलपर्यंत असतो.