आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व पाणीपुरवठा योजना एकाच खात्यात आणणार, बबनराव लोणीकर यांचे सूतोवाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्यामनपा, नगर परिषद, जिल्हा परिषदेसह इतर यंत्रणांकडून राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजना एकाच खात्याच्या अखत्यारीत आणण्याचे सूतोवाच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनविारी (१३ डिसेंबर) केले. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित प्रेस मीटमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले की, गुजरातच्या धर्तीवर सध्याच्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र पाणीपुरवठा खाते अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत राज्याच्या अर्थमंत्र्यांसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. समांतर जलवाहिनी योजनेची माहिती घेतल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.
आधीहक्काचे, नंतर समुद्राचे
कोकणातूनसमुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याबद्दल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते होईल तेव्हा होईल. तोपर्यंत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. त्यासाठी कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही.
दरम्यान, दुष्काळी भागातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या मूळ खर्चापैकी १५ टक्के खर्च राज्य सरकार करणार असल्याचे लोणीकर यांनी तापडिया नाट्य मंदिरातील सत्कार सोहळ्यात सांिगतले. ते म्हणाले की, जिल्हा परिषद, नगर परिषदांनी त्यांच्या उत्पनातील २० टक्के रक्कम पाणी पुरवठ्यावर खर्च करावी असा दंडक करण्यात येणार आहे. मला जालन्याचा पालकमंत्री होण्याची इच्छा असली तरी जालन्यासह औरंगाबादचा कार्यभार स्वीकारण्याची तयारी आहे.

सिंचन घोटाळ्याची चौकशी हे तर बक्षीस
सिंचनघोटाळ्यातील मंत्र्यांची चौकशी सुरू होणे म्हणजे मी केलेल्या पाठपुराव्याचे बक्षीस आहे. दुष्काळ नविारणासाठी केंद्राकडून अपेक्षित साडेसात हजार कोटीतील ४०० कोटी रुपये पाणीपुरवठा खात्याला मिळणार असून याशविाय आणखी काही निधी मिळवण्याचा प्रयत्न अाहे. बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना तसेच देखभाल दुरुस्तीसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याचे संकेतही त्यांनी दिले. संघटनेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सुनीलचंद्र वाघमारे, भाऊराव मुळे, रमेश राऊत यांनी लोणीकर, आमदार अतुल सावे, नारायण कुचे यांचे स्वागत केले.