आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Ambedkar Birth Anniversary Celebration

जगात झाली हायफाय जयंती वनट्वेंटीफाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र कार्यालयापासून ते शहरातील वस्ती-वस्तीत थाटात साजरी करण्यात आली. औरंगाबादेतही भीमसैनिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. "जगात झाली हायफाय, भीमजयंती वनट्वेंटीफाय' या गाण्यावर त्यांनी जल्लोष केला.
वाहन रॅली, शोभायात्रा, लेझीम पथक, ढोल पथकांनी वातावरणात चांगलाच रंग भरला. विविध संस्था-संघटनांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग घेऊन सादर केलेले सामाजिक संदेश देणारे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. "युद्ध नको बुद्ध हवा', "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' असे संदेश या देखाव्यातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत होते. कडक उन्हातही भीमसैनिकांकडून जोरदार तयारी करण्यात येत होती. सायंकाळी मुख्य मिरवणुकीत अाबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परंपरेनुसार क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, पोस्ट ऑफिसमार्गे भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. भीमरथांवर केलेले आकर्षक देखावे मिरवणुकीत प्रमुख आकर्षण होते.

राजकारण्यांची गर्दी : विविधसंस्था-संघटनांनी भीमसैनिकांच्या स्वागतासाठी चौकाचौकांत व्यासपीठ उभारले होते. विविध पक्षांच्या शाखाप्रमुखांपासून मराठवाडा प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्व मंडळी या वेळी सहभागी झाली होती. यात नगरसेवकांचाही समावेश होता. आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, किशनचंद तनवाणी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार सतीश चव्हाण, महापौर त्र्यंबक तुपे, मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक गजानन बारवाल, मनसेचे सुमीत खांबेकर यांच्यासह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती नांेदवली.
यांचासहभाग : क्रांतिसूर्यमहात्मा फुले सामाजिक प्रतिष्ठान, भीमशक्ती, भारिप बहुजन महासंघ, महर्षी वाल्मीक क्रीडा मंडळ, सर्वपक्षीय उत्सव समिती, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, जीवकनगर मित्रमंडळ, भारतीय जनता पक्ष, राष्ट्र क्रांती संघ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, नागसेन मित्रमंडळ, बहुजन समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पँथर्स रिपब्लिकन, मनसे, लोकशाही विचार मंच, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी महासंघ, बीएसएनएल कर्मचारी संघटना, भारतीय जनसंघर्ष संघटना, भारतीय बौद्ध महासभा, युवा प्रगती मित्रमंडळ, इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल, शिवसेना, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, सरकार ग्रुप, सार्वजनिक बांधकाम विभाग, नालंदा ग्रुप, गोदावरी खोरे, मनपा, पंचशील क्रीडा मंडळ, अश्वमेध क्रीडा मंडळ आदींचा सहभाग होता.

ढोल पथकांनी घेतली डीजेची जागा
शहरातील बहुतांश आयोजकांनी डीजेऐवजी ढोल बँड पथकाला पसंती दिली. मिरवणुकीत डीजेंचा सहभाग व्हावा यासाठी विविध आयोजकांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र त्यानंतरही मिरवणुकीत मोजक्याच सहभागी मंडळांकडे डीजे लावण्यात आल्याचे दिसून आले. या वेळी पोलिस प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. मिरवणुकीसाठी १७०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

जिवंत देखावे खास आकर्षण
मैत्रेय क्रीडा मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बाबासाहेबांचे कार्य आणि पाणी वाचवा पाणी अडवा असे सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. तसेच वाॅरियर्स तलवारबाजी क्लबच्या २० सदस्यांनी सादर केलेले तलवारींचे कसब पाहून सर्वजण थक्क झाले होते.