आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ विषयी वक्तव्यानंतर, पुरंंदरेंचा व्हिडिओ व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज 'गोब्राह्मण प्रतिपालक' नव्हते. आम्हाला मात्र छत्रपतींचा वेगळाच इतिहास शिकवण्यात आला, असे शरद पवार बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. यानंतर शिवाजी महाराजांबाबतच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
काय आहे व्हिडिओमध्ये... 
- बाबासाहेब पुरंदरे एका ठिकाणी काही लोकांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलची माहिती देत आहेत. त्यात ते शिवाजी महाराजांच्या काळात काय घोषणा होती हे श्रोत्यांना सांगत आहेत. 
- व्हिडिओची सुरुवातच शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने होते. पुरंदरे म्हणतात, 'महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय' अशी घोषणा आहे. त्याच्यामध्ये कुठेही गोब्राह्मण प्रतिपालक असे शब्द नाही.' 
- या व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात केलेल्या वक्तव्याला दुजोरा मिळत आहे. वास्तविक पवारांनीही ज्येष्ठ इतिहासकारांचा संदर्भ दिले होता.
 
काय म्हणाले होते शरद पवार 
- श्रीमंत कोकाटे लिखित 'छत्रपती शिवाजी महाराज' या सचित्र चरित्राचे बुधवारी पवारांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन झाले. यावेळी पवार म्हणाले, 'शिवाजी महाराजांबद्द्ल आम्हाला चुकीचा इतिहास शिकवण्यात आला आहे.' 
- मराठ्यांचे ज्येष्ठ इतिहासकार त्र्यंबक शेजवलकरांचा संदर्भ देऊन पवार म्हणाले, 'गोब्राह्मण प्रतिपालक हा शब्द अनैतिहासिक आहे. शेजवलकरांनी ते सिद्ध केले होते. मात्र विशिष्ट वर्गाने त्यांना सोईचा इतिहास तेवढा सांगितला. तो बदलून वास्तव इतिहास लोकांसमोर आणला गेला पाहिजे.' 
- शिवाजी महाराज हे मुस्लिमद्वेष्टे नसल्याचेही यावेळी पवारांनी स्पष्ट केले. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबासाहेब पुरंदरेंचा व्हिडिओ... 
 
येथे क्लिक करुन वाचा, काय म्हणाले होते शरद पवार... 
बातम्या आणखी आहेत...