आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी मशीद पुन्हा बांधून द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अयोध्येत बाबरी मशीद पुन्हा बांधून देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत केंद्राकडे करण्यात आली आहे. बाबरी मशीद पडून २२ वर्षे लोटली तरी शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. मशीद पाडणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली नाही. आता तरी शासनाने तातडीने पावले उचलून कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावर प्रदेश सचिव अब्दुल रऊफ शेख, कैसर कुरैशी, अब्दुल रशीद, अय्युब पटेल, मोहंमद जफर, रईस शेख, शेख इरफान, अख्तर पटेल, शेख उस्मान, शेख इम्रान यांच्या सह्या आहेत.
कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा
बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आझाद युवा ब्रिगेड या संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष मोबीन अन्सारी, वसीम सिद्दिकी, आरेफोद्दीन सिद्दिकी, मोहंमद शाहीद राजा, अल्तमश हाशमी, उमैद सिद्दिकी, हाजी इम्रान पटेल, सलमान मन्सुरी, सलीम पटेल वाहेगावकर यांच्या सह्या आहेत.