आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ बालिकेची डीएनए चाचणी करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - नवीन शिवराई गावात रॉकेल टाकून खून करण्यात आलेल्या बालिकेची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी त्या बालिकेच्या आई-वडिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले आहेत. बालिकेची आई चंदा व वडील दिलीप कर्जुले यांना पोलिसांनी गुरुवारी घाटीत नेऊन त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले. डीएनए चाचणीचा अहवाल महिन्याभरात प्राप्त होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.