मराठा, ओबीसी आणि दलितांच्या एकत्रीकरणाचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण रा. स्व. संघाप्रमाणेच दलित आणि मराठा समाजातील काही लोकांचा या सामाजिक अभिसरणाला विरोध आहे. पण जर हे तीन समूह एकत्र आले तर देशाचा चेहरामोहरा बदलणार नाही...
विषमतेमुळे लोकशाहीला धोका
बाबासाहेबांना आर्थिक समानता हवी होती. त्यांनी खूप प्रयत्न केले. पण स्वत:चे खिसे भरणारे राज्यकर्ते आणि मुजोर प्रशासनामुळे गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात विषमतेची दरी अधिक वाढत चालली आहे...
संविधानावर बोलताना
आपल्या शेवटच्या भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की समता बंधुत्व हा संविधानाचा पाया आहे. या देशातील विषमता नष्ट झाली पाहिजे. विषमता वाढत गेली तर लोकशाही टिकणार नाही. मात्र गेल्या ६५ वर्षांत विषमता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. दलित-सवर्ण असा लढा आता राहिलेला नसून श्रीमंत-गरीब असा संघर्ष धारदार होत चालला अाहे. गरीब वर्ग दिवसेंदिवस गाळात जात अाहे. श्रीमंतांच्या तिजोरीत वाढ होत चालली आहे. श्रीमंत-गरीब अशा विषमतेबरोबरच ग्रामीण-शहरी आणि शेतकरी-नोकरदार हे संघर्षही चिंताजनक आहेत. बाबासाहेब म्हणाले होते की शिका... पण, आज राज्यकर्त्यांनी अशी काही परिस्थिती निर्माण केली आहे की, ज्यांच्याकडे पैसे आहेत, तेच उच्च शिक्षण घेऊ शकतात. एकीकडे आरक्षणामुळे ज्या तळागाळातील समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, तो समाज नवश्रीमंत होऊन आपल्या बांधवांना विसरत चालला आहे. तो श्रीमंतांच्या बाजूला बसून आपल्याच विश्वात रमलेला दिसतो आहे. असे होऊ नये असे बाबासाहेबांना वाटत होते.
मंत्रालयासमोर आपल्या मागण्यांसाठी शेकडोंच्या संख्येने लोक रांगा लावताना दिसतात. बाबासाहेब म्हणत की, घटनेने दिलेल्या समान हक्काच्या माध्यमातून लोकराज्य निर्माण झाले पािहजे. पण तसे होता सत्ताराज्य होऊन सत्तेच्या माध्यमातून पैसा, पैशांमधून सत्ता असे दुष्टचक्र सुरू आहे. सत्ताधाऱ्यांबरोबर अधिकारी वर्गही मुजोर होत चालला आहे, सर्वसामान्य लोकांची सोडाच, पण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची कामे होत नाहीत.