आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने ताराबंळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक ९५ बाळकृष्णनगर अंतर्गत येणाऱ्या शिवनेरी काॅलनीत मागील वीस वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी, पथदिवे, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. नुकतेच पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर चिखल झाला असून ड्रेनेजलाइन तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे.
ड्रेनेजच्या पाण्याला वाट काढून देण्यासाठी काही जणांनी ड्रेनेजचे ढापे उघडले, तरीही समस्या कायम आहे. काहींना घरातील घाण पाणी काढावे लागले. दुर्गंधीयुक्त पाणी घरात साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरात पथदिवे नसल्याने रात्री सर्वत्र अंधार असतो. याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वारंवार तक्रार करूनही या समस्येकडे लक्ष देत नाही. आम्ही गुंठेवारी भरण्यासाठी तयार असून आम्हाला मूलभूत सुविधा द्या, अशी मागणी विनोद पवार, अरुण पवार, भाऊसाहेब कोरडे, एकनाथ जवादवाड, ब्रदी अंबेकर, संजय आव्हाड आदींनी केली.
- महानगरपालिकेला पत्र देण्यात आलेले आहे. पालिकेकडे अजून निधी उपलब्ध नसून बजेट झाल्यानंतर ड्रेनेजलाइन बदलण्यात येणार आहे.
ज्योती मोरे, नगरसेविका
- पावसामुळे रस्त्यावर चिखल होतो. पथदिवे नसल्यामुळे वाहनधारकांना येण्या-जाण्यासाठी रात्री त्रास होतो. या समस्यांकडे नगरसेविका यांनी लक्ष िदले पाहिजेत.
विनोद पवार, रहिवासी
- वारंवार समस्या सांगूनही नगरसेविका याकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी घुसले आहे. तत्काळ यावर उपाययोजना कराव्यात.
अरुण पवार, रहिवासी
- ड्रेनेजचे पाणी तुंबल्यामुळे बोरिंगला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
भाऊसाहेब कोरडे, रहिवासी
- पथदिवे नसल्याने रात्री अंधारात वाट शोधावी लागते. ड्रेनेजची समस्या वारंवार भेडसावत आहे. मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून तत्काळ यावर उपाययोजना कराव्यात.
रवी पाटील, रहिवासी
बातम्या आणखी आहेत...