आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बेटी बचाव’अंतर्गत पोस्टर प्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हॅथवे एमसीएन, औरंगाबाद टाइम्स व आधारच्या वतीने राबवण्यात येणार्‍या स्त्री भ्रूणहत्याविरोधी व बेटी बचाव सप्ताहअंतर्गत मंगळवारी मॉडल डी.एड. कॉलेज येथे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

तलत नसीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. समिना कौसर अन्सारी व शेख अखिल अहमद यांनी डी.एड.च्या विद्यार्थिनींकडून स्त्रीचे महत्त्व, स्त्री भ्रूणहत्या, महिलांची कारकीर्द, भारतीय थोर महिला, नवीन युगाचे प्रश्न, लेकीचे प्रेम यासारख्या विषयांवर अनेक पोस्टर तयार करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाच्या या कार्यक्रमात हॅथवे एमसीएनचे याह्या खान, औरंगाबाद टाइम्सचे संपादक शोएब खुसरो व आधारचे सोहेल जकियोद्दीन यांची उपस्थिती होती.
हेच प्रदर्शन 12 जुलै रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर मजनूहिल येथे शहरवासीयांसाठी 3 दिवस खुले राहील. वरील विषयावरील चित्रे बुधवारी रात्री 9 पर्यंत औरंगाबाद टाइम्सच्या कार्यालयात आणून द्यावीत, असे आवाहन आयोजक सोहेल जकियोद्दीन यांनी केले आहे.