आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागडेंना हादरा, ‘देवगिरी’ कल्याण काळेंच्या हाती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार कल्याण काळे यांनी जोरदार मुसंडी मारली. काळे यांचे पूर्ण पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले. प्रतिष्ठा पणाला लावूनही बागडे-गाडेकर यांच्या पॅनलला फक्त सोसायटी मतदारसंघाची एकच जागा मिळाली.
हरिभाऊ बागडे, डॉ. कल्याण काळे, नामदेवराव गाडेकर, विलास औताडे या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार मैदान गाजले. केशवराव औताडे यांचे चिरंजीव विलास औताडे यांनीही तिसरे पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले होते. डॉ.गाडेकर हे विद्यमान चेअरमन, तर विलास औताडे हे व्हाइस चेअरमन होते. या दोघांमध्ये पूर्ण पाच वर्षे बेबनाव राहिल्याने कारखाना गेल्या सात वर्षांपासून सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे सर्व मतदारांत चीड निर्माण झाली होती. यातून मतदारांनी बागडंेना हादरा देत डॉ.कल्याण काळे यांच्या बाजूने कौल दिला आहे.

विजयी उमेदवार
फुलंब्री-जातेगाव गट : नितीन शंकरराव देशमुख, अजगर पटेल, लहू मानकापे. वारेगाव-गणोरी गट : सुभाष गायकवाड, सुभाष जाधव , गणेश तांदळे. बिल्डा-लाडसावंगी गट : पुंडलिराव अंभोरे, जगन्नाथ काळे, सुदाम मते. चिकलठाणा माळीवाडा गट : रावसाहेब औताडे , राजेंद्र जगदाळे, बबनराव डोळस. पिंप्रीराजा-गोलटगाव गट : विलास गव्हाड, श्याम गावंडे, शिवाजीराव पवार. अनुसूचित जाती : भीमराव गंगावणे . विमुक्त जाती: गणेश सोलंकर. ओबीसी : देविदास ढंगारे. महिला राखीव : कमलबाई उबाळे, कांताबाई म्हस्के, तर डॉ. गाडेकर यांचे िचरंजीव आशिष गाडेकर हे सोसायटी मतदारसंघातून चार मतांनी विजयी झाले आहेत.
बागडेंना चौथा फटका
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व काँग्रेसचे िजल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांना या पंधरा िदवसांत पराभवाचे फटके बसत गेले. फुलंब्री व औरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघ, औरंगाबाद बाजार समिती व आता देवगिरी साखर कारखाना या िनवडणुकीत वरील दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मोठा हादरा बसला आहे. डॉ.कल्याण काळे यांचे पॅनल पाडण्याचा प्रयत्न औताडे गटाने केला खरा; परंतु मतदारांनी औताडेंनाच हात दाखवला. आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघात डॉ.कल्याण काळे हे एकमेव काँग्रेसचे नेते झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...