आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या यात्रेत चुलीवरच्‍या मडक्‍यातले मटण आहे प्रसिद्ध, घुंगराच्‍या नादात वृद्धही होत बेभान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विविध लोककलांच्‍या रंगांची मुक्‍तपणे उधळण करणा-या चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम यात्रेला सुरूवात झाली आहे. कडाक्‍याच्‍या थंडीत दरवर्षी दिड महिना ही यात्रा भरते. मातीच्‍या मडक्‍यात चुलीवर शिजलेले मटण व खमंग भाकरीची चव चाखण्‍यासाठी दरवर्षी हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात. divyamarathi.com च्‍या या संग्रहात जाणून घेऊया बहिरम बाबाच्‍या अनोख्‍या यात्रेविषयी काही खास बाबी....
दीड महिना चालणारी यात्रा
- दरवर्षी डिसेंबर महिन्‍याच्‍या दुस-या आठवड्यापासून या यात्रेला सुरूवात होते.
- विदर्भातील दीड महिना चालणारी यात्रा म्हणून बहिरम यात्रा प्रसिद्ध आहे.
- महाराष्‍ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
- पुर्वी लोककलांच्‍या नावाखाली काही अवैध प्रकार येथे होत असत.

बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्‍पर्धा होत असत. परिसरातील लोक राहुट्या, तंबू टाकून पहाडात मोहल्ले उभारत. रात्री उशिरापर्यंत यात्रेत विविध कार्यक्रम होत असत. तंबूंमध्‍ये एकमेकांना मेजवान्‍या दिल्‍या जात होत्‍या. येथील देवालाही पूर्वी बक-याचा नैवद्य दिला जायचा असे भाविक सांगतात. दोन्‍ही वेळी मटणाची पंगत असल्‍याने कोणीही कोणाच्‍या पंगतीत जायचे. इंग्रजांनीही या यात्रेची दखल घेतली होती. त्यावेळी तहसीलदारही येथे मुक्‍कामी असत व महिनाभर कोर्ट इथेच भरत असे.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, यात्रेतील काही खास बाबी...