आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैजू पाटील यांचे वन्यजीव छायाचित्र आशियात पहिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आशिया पातळीवरील छायाचित्रांच्या स्पध्रेत वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. भरतपूर पक्षी अभयारण्यात पाणकावळा (लार्ज कार्मोस्ट) एका गोल्डन फिशला गिळत असलेले छायाचित्र पंधरा हजार छायाचित्रांत देखणे ठरले. या स्पध्रेत भारत, कोरिया, नेपाळ, पाकिस्तान, जपान आदी ठिकाणांहून छायाचित्रे पाठवण्यात आली. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सेवस व एस बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली. वन्यजीव छायाचित्राचा सेवससारखा पुरस्कार प्राप्त करणारे औरंगाबादचे बैजू हे पहिले भारतीय ठरले. बैजू यांना एशिया बेस्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर, सेंच्युरी एशिया वाइल्ड महाराष्ट्र फोटोग्राफर ऑफ द इयर, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड पुरस्कार, कॅनन फोटोग्रॉफर ऑफ द इयर, इमॅरेट दुबईमधील फाइन आर्ट व सेवस एस बँक असे अनेक पुरस्कार मिळाले. राजस्थानातील भरतपूर अभयारण्यातील छायाचित्रासाठी बैजू यांना सतत आठ दिवस प्रतीक्षा करावी लागली. वन्यजीव फोटोग्राफीसाठी बैजू यांनी संपूर्ण आफ्रिकेचे भ्रमण केले आहे.