आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज ऑटोत दीड कोटीचा अपहार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - बजाज ऑटो कंपनीत दुचाकीसाठी लागणाºया साहित्य खरेदीत दीड कोटीचा अपहार झाल्याची माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी राज गौड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
बजाज कंपनीतील पीपीसी व एमसीडी विभागात दुचाकीच्या उत्पादनासाठी लागणारा माल विविध व्हेंडरकडून तयार क रवून घेतला जातो आणि तो पुरवठा करण्याचे कामकाज ऑनलाइन चालते. यासंबंधीची ऑर्डर आणि सूचना ऑनलाइन दिली जाते. 5 मे 2012 रोजी कंपनीने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे व्हेंडरकडून माल येतो किंवा नाही याची ऑनलाइन तपासणी या विभागाचे व्यवस्थापक पी. व्ही. मोहनन यांनी केली असता, कंपनीने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त माल आल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी विविध विभागांतील ऑनलाइन कागदपत्रे तपासली असता 29 जानेवारी ते 31 मे 2012 दरम्यान 171 बनावट चालान व सह्या क रून कंपनीला माल पुरवल्याचे निष्पन्न झाले. यामुळे कंपनीला 39 लाख रुपयांची एक्साइज ड्यूटी भरावी लागली. यात सुमारे 1 कोटी 60 लाख 92 हजार 225 रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मोनी स्पोक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक नीरज मुनोत, आरटीएस लॉजिस्टिकचे मालक मनोहर रेबारी आणि त्यांचे कर्मचारी देवीचंद बिघोत, मधुकर रोकडे, श्यामसिंग व या टोळीला सहकार्य करणारे बजाज कंपनीचे टेक्निकल असिस्टंट दीपक जगताप, ऑफिस असिस्टंट शिवाजी देशपांडे, विलास कल्याणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनोहर रेबारी, दीपक जगताप, शिवाजी देशपांडे व विलास कल्याणकर यांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक किशोर नवले पुढील तपास करत आहेत.