आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Auto News In Marathi, Salman Khan, Divya Marathi, Aurangabad

बजाजच्या कामगारांचे अच्छे दिन, मिळाली १० हजारांची पगारवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज एमआयडीसीतील बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या ३२०० कायमस्वरूपी कामगारांचे गुरुवारपासून "अच्छे दिन" सुरू झाले. कामगार संघटना व कंपनी व्यवस्था पनात वाटाघाटीनंतर कामगारांना दरमहा १० हजार ५० रुपयांची वेतनवाढ देण्यात आली. सोबतच आरोग्यविषयक सुविधा व इतरही सुविधा मिळतील.
बजाज ऑटो एम्प्लॉइज युनियन व व्यवस्था पनात चार महिन्यांपासून बैठका सुरू होत्या. मागचा करार ३१ जुलै २०१४ रोजी समाप्त झाला. युनिय नच्या वतीने २५ फेब्रुवारी २०१४ रोजी वेतनवाढ व इतर मागण्यांचे पत्र व्यवस्था पनाकडे दिले होते. वेतन करार समि तीमध्ये युनिय नच्या ९ कामगार प्रतिनिधी व व्यवस्था पनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

साडेतीन वर्षांचा करार
10050 रु.ची मासिक वाढ 9200

उर्वरित लाभ अप्रत्यक्ष स्वरूपात
वाढीसाठी हा मोबदला : वाढीच्या मोबदल्या त युनियनकडून कंपनीतील चेसिस व प्रेस फेब्रिकेशन विभाग अन्य कंपनीला सोपवण्या ची व्यवस्था पनाची मागणी मान्य झाली. या विभागातील १८६ कामगार कंपनीतील इतर वि भागात स्थलांतरित होतील. त्यांना निवृत्तीपर्यंत काम करता येईल, असे युनियनचे सचिव प्रमोद फडणीस म्हणाले.